शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

८ वाहनांवर ‘महसूल’ची कारवाई

By admin | Updated: June 29, 2014 00:23 IST

औंढा नागनाथ : येथे नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचललेली असून शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून

औंढा नागनाथ : येथे नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचललेली असून शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून शनिवारी दिवसभर वाळूची अवैध तस्करी करणारी आठ वाहने पकडून चालक -मालकांवर कारवाई करण्यात आली. तर जवळा बाजार येथे दोन ट्रॅक्टर चालकांविरोधात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात १० ठिकाणी रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पावतीविना काहीजण अवैधपणे वाळूचा उपसा करून वाहतूक करीत असल्याचे चित्र होते. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसांपूर्वीच औंढा तहसील कार्यालयाचा पदभार घेणारे तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी अवैध वाळूची तस्करी थांबविण्यासाठी तलाठी माणिक रोडगे, व्ही.व्ही. मुंडे, एम.बी. भुसावळे, गरूड यांचे पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान औंढा- गोळेगाव रस्त्यावरून वाळूची वाहतूक करणाऱ्या एम.एच. ४०-एन.५०, एम.एच.२९- २६१, एम.एच.३८- सी ७७४, एम.एच. २७ एक्स ४२२३ व नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना थांबवून चालकांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेल्या पावत्यांवर खाडाखोड केलेली आढळून आली. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर येथील रेती घाटांच्या पावत्या त्यांच्याकडे दिसून आल्या. त्यामुळे तहसीलदार मदनूरकर यांनी शंका आल्याने ४ टिप्पर व दोन ट्रॅक्टर औंढा पोलिस ठाण्यात जमा केले. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी १० च्या सुमारास याच पथकाने आजरसोंडा तपोवन मार्गे जवळा बाजारकडे वाळू घेऊन येणारे दोन ट्रॅक्टर पकडले. चालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची पावती आढळून आली नाही. यावेळी ट्रॅक्टरचे चालक-मालक निवृत्ती कदम व राम कदम यांनी पकडलेले ट्रॅक्टर घेऊन चालक पळून जात होते. त्यामुळे त्यांच्यावर अवैध गौणखनिजाची विना परवाना चोरी करून माल नेल्याप्रकरणी हट्टा पोलिस चौकीमध्ये तहसीलदार श्याम मदनूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शनिवारी दुपारी २ वाजता नागनाथ मंदिराच्या पाठीमागून दरेगावकडे अवैध वाळू घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर पकडून पोलिस ठाण्यात जमा केले आहेत. पकडण्यात आलेल्या वाहन चालक- मालकांकडून सोमवारी अधिकृत चालनद्वारे पैसे भरून घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे मदनूरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)