शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पर्यवेक्षिकांच्या परीक्षेचा दोन तासात निकाल

By admin | Updated: May 18, 2015 00:26 IST

बीड : पर्यवेक्षिकापदासाठी रविवारी अंगणवाडीसेविकांची परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. परीक्षेनंतर अवघ्या दोन तासात निकाल जाहीर करण्यात आला.

बीड : पर्यवेक्षिकापदासाठी रविवारी अंगणवाडीसेविकांची परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. परीक्षेनंतर अवघ्या दोन तासात निकाल जाहीर करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे सोमवारी मुलाखती असून लगेचच निवड यादीही लावण्यात येईल.बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत पर्यवेक्षिकांच्या ३५ जागांसाठी भरती होत आहे. अंगणवाडीसेविकांमधूनच पदे भरावयाची आहेत. १० वर्षांपेक्षा अधिक सेवा, दहावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडीसेविकांकडून अर्ज मागविले होते. ३५ जागेसाठी ७४२ अर्ज आले होते. रविवारी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत ७५ गुणांची परीक्षा गुरुकुल स्कूल व चंपावती विद्यालयात झाली. १२ उमेदवारांनी दांडी मारली. ३५ पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या ९८ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यांची यादी जि.प. च्या संकेतस्थळावरही उपलब्ध केली आहे. परीक्षाप्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि.प. सीईओ नामदेव ननावरे, बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. ए. इनामदार ठाण मांडून होते.गुणवत्ता, सेवाज्येष्ठतेला प्राधान्य७५ गुणांच्या लेखी परीक्षेनंतर सोमवारी सकाळी दहा वाजता ९८ पात्र उमेदवारांतून ३५ पर्यवेक्षिकांची निवड केली जाणार आहे.सेवाज्येष्ठता, गुणवत्तेनुसार प्राधान्य राहणार असून सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व व बालप्रकल्पाविषयीचा अभ्यास पाहून गुण दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)चंपावती परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांनी मोबाईलचा वापर केला. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग झाला, अशी तक्रार कास्ट्राईबच्या अरूणा आठवले यांनी केला आहे.४मोबाईल वापरणाऱ्या उमेदवारांसह संबंधित परीक्षा कक्षावरील कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.चिठ्ठीमुळे यंत्रणा कामाला४चंपावती केंद्रावर परीक्षा प्रक्रिया सुरू असताना एका खिडकीतून एक कागद आत फेकण्यात आला. काही उमेदवारांनी हा कागद कॉपीशी संबंधित असल्याचा आरोप केला. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी तो कागद ताब्यात घेतला. या कागदाची तपासणी केली असता त्यावर प्रश्नपत्रिकेसंदर्भात कोणताच मजकूर नसल्याचे आढळून आले. सदरील चिठ्ठी जप्त केली आहे.