शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

किन्होळा येथे पुलाची श्रमदानातून दुरूस्ती

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

वसमत : तालुक्यातील किन्होळा नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला होता. पुलाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेवटी किन्होळा ग्रामस्थ मैदानात उतरले आहेत.

वसमत : तालुक्यातील किन्होळा नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला होता. पुलाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेवटी किन्होळा ग्रामस्थ मैदानात उतरले आहेत. श्रमदानातून तात्पुरता रस्ता करण्याचे काम ग्रामस्थांनी बुधवारपासून सुरू केले.
किन्होळा हे राज्य रस्त्यालगतचे गाव आहे. या गावाला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्या रस्त्यावर असलेल्या नदीवर बांधण्यात आलेला पूल अत्यंत चुकीचा व सुमार दर्जाचा झालेला आहे. पूल जमीन लेवलला असल्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी पुलावरून जाते व ग्रामस्थांचा संपर्क तुटतो. या पुलावरून गतवर्षी दोन ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. पुलाच्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी, निवेदने दिलेली आहेत. मात्र आजवर या पुलाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. यावर्षीच्या पहिल्याच जोरदार पावसात नदीला पूर आला व पूल वाहून गेला. त्यामुळे ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.या पुलाची दुरूस्ती व पर्यायी व्यवस्था जलदगतीने होईल, अशी अपेक्षा होती; परंतु अद्याप काम सुरू न झाल्याने अखेर श्रमदानातून पुलाच्या दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. बुधवारी श्रमदानासाठी पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलले आहे. अ‍ॅड. शिवाजी जाधव मित्रमंडळाचे सदस्य, सरपंच, ग्रा.पं. सदस्य, गावातील तरूण, ग्रामस्थ व पदाधिकारी श्रमदानासाठी उतरले आहेत. तात्पुरती व्यवस्था या श्रमदानातून करण्यात येणार आहे. श्रमदानाच्या कामासाठी सरपंच बालाजीराव जाधव, व्यंकटराव जाधव, चेअरमन बालाजी जाधव, छत्रपती जाधव, श्रीकृष्ण लगारे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)