शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन

By admin | Updated: May 12, 2015 00:53 IST

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे केली.

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे केली. विभागाच्या खरीप हंगामाची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.खडसे म्हणाले की, दुष्काळ उपाययोजनांसाठी बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांना पतपुरवठा, कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळ आणि वादळात हानी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी ६ टक्के व्याजदर ठेवण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. बँका १२ टक्के व्याज घेत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, खडसे म्हणाले की, ६ टक्के व्याजदराला यावर्षी मान्यता दिली आहे. ३ वर्षांपासूनचे जे कर्ज आहे, ते शासन तिजोरीतून भरण्याची तयारी ठेवून आहे. त्यामुळे बँकांनी १२ टक्के व्याजदराचा अट्टहास शेतकऱ्यांकडे धरू नये. सर्वंकष पीक विमा योजना लागू करण्याचे धोरण शासनाने तयार केले आहे.खत व बियाणांचा साठा उपलब्ध आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. जनधन विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत नाममात्र दरात अवजार योजना आणली आहे. आॅनलाईन ७/१२, जलयुक्त शिवार, पुनर्भरण योजना शासन राबवीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. १०० टक्के कर्ज व वीज बिल माफ केले. यावर्षीचे कर्ज पुनर्गठन केले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा मनोबलाने परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. असे असतानाही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करण्याचे कारण शेतकऱ्यांनाच माहिती.१५२ कोटी थकलेअनुदानाचे शेतकऱ्यांपर्यंत वाटप झाले आहे. १५२ कोटी रुपये अनुदान देणे बाकी आहे. आॅनलाईन रक्कम अदा केली जात आहे. भाडेपट्ट्याने (ठोक्याने) ज्यांनी जमीन दिली आहे. तेथे अनुदान देण्यावरून वाद झाले आहेत. अनुदान कुणाला द्यावे यासाठी सक्सेशन मागविण्याचा निर्णय घेतला आहे.