शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी रुपयांच्या जागेसाठी दहा रुपये भाडें

By admin | Updated: April 12, 2015 00:41 IST

शिरीष शिंदे ,बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या संस्थानाच्या मालकीच्या असलेल्या इनामी, मशीद व दर्गाहच्या जमिनी अनाधिकृतपणे भाड्याने दिल्या गेल्या आहेत.

शिरीष शिंदे ,बीडजिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या संस्थानाच्या मालकीच्या असलेल्या इनामी, मशीद व दर्गाहच्या जमिनी अनाधिकृतपणे भाड्याने दिल्या गेल्या आहेत. ८२ प्रकरणे एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक प्रकरणे याच जिल्ह्यातील असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक खालेक पेंटर यांनी दिली. संस्थानाच्या जमिनींचा आकडा पाहिला तर तो सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा आहे. बीड येथील जामे मशीद किल्ला बीड यांची पाटोदा तालुक्यातील पाचेगाव येथे ३५ एकर ३० गुंठे, साखरे बोरगाव, ता. बीड येथे ३२ एकर २२ गुंठे व २० एकरी १७ गुंठे जमीन आहे. तसेच बीड शहरातील पांगरी रोड व बालेपीर येथे २० एकर १३ गुंठे, ३२ एकर २० गुंठे व २५ एकर १ गुंठा जमीन या भागात आहे. यासह इतर जागांवरील जमीन ४३३ एकर २८ गुंठे आहे. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेट, २४ जानेवारी १९७४ मध्ये वरील जागांचा तपशील दिला आहे. या जागांवर सध्या अतिक्रमण असल्याचे खालेक पेंटर यांनी सांगितले. मशीदमध्ये सेवा करणाऱ्या सेवकांसाठी या इनामी जमिनी दिल्या गेल्या होत्या. वक्फ अ‍ॅक्ट १९९५ कलम ५६ नुसार, संस्थांनाच्या इनामदारांना या जमिनी भाड्यावर किंवा अल्प काळासाठी भाड्यावर देता येत नाही. जमीन द्यावयाची असल्यास वक्फ बोर्ड व इनामदार व शासनाच्या परवागीने ती केवळ तीन वर्षांसाठी देता येते. प्रत्यक्षात मात्र संस्थानाच्या जमिनी परवानगी न घेताच शंभर, पन्नास व दहा रुपये प्रती महिना भाडे घेऊन देण्यात आला असल्याचा दावा खालेक पेंटर यांनी केला.दर्गाह हजरत शहेंशाहवली यांची गेवराई तालुक्यातील पात्रूड व बीडमध्ये ७९६ एकर जमीन आहे. जामा मशीद किल्ला, बीड संस्थानाची १४३ एकर जमीन बीड शहरात आहे. दर्गा हजरत शाहबु बकर यांची महामार्गालगत सर्व्हे नंबर १८५ व १८६ गट क्रमांकामध्ये ४७ एकर जमीन आहे. दरम्यान, खिदमत इमान जमीन यावर निर्णय तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. सदरील जमीन जप्त करण्याचे आदेश १९९७ मध्ये दिले होते. एकच जमीन दोन वेळा विकली गेली आहे असेही खालेक पेंटर म्हणाले. केंद्र शासनाने नेमली होती ३० खासदारांची समितीबीड जिल्ह्यासह राज्यातील वक्फ बोर्डांतर्गत असलेल्या जमिनी भू-माफियांनी बळकाविल्या संदर्भाचा मुद्दा खालेक पेंटर यांनी उचलून धरल्यानंतर केंद्र शासनाने ३० खासदारांची समिती नेमली होती. समितीमधील काही सदस्यांनी अनेक ठिकाणीच्या जमिनीची पहाणी केली होती. त्यांनतर २००७ मध्ये राज्य शासनाने सेवानिवृत्त न्यायाधीश अतक शेख यांची समिती स्थापन केली होती. वक्फ बोर्डाच्या जमिनी परत घेण्याचे व कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. दरम्यान, बीड, औरंगाबाद, परभणी, जालना जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी बळकाविण्यात आल्या आहेत.