शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सभा आजही जालनेकरांच्या स्मरणात

By admin | Updated: October 9, 2014 00:36 IST

संजय कुलकर्णी , जालना आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण देशाचे, राज्याचे लक्ष वेधणाऱ्या,

संजय कुलकर्णी , जालनाआपल्या वक्तृत्वाने संपूर्ण देशाचे, राज्याचे लक्ष वेधणाऱ्या, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या विविध प्रमुख नेत्यांच्या निवडणूक प्रचार सभा जालनेकरांच्या आजही स्मरणात आहेत.६३ वर्षांमध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या-त्या वेळी प्रमुख राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी सभेच्या निमित्ताने जालन्यात हजेरी लावली. पहिली मोठी सभा १९५१ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची झाली. पंडित नेहरुंच्या या सभेसाठी मराठवाड्यातून काँग्रेसजन जालन्यात दाखल झाले होते.१९७८ मध्ये इंदिरा गांधी यांची सभा झाली. त्यावेळी त्या सत्तेबाहेर होत्या. मात्र त्यावेळी स्थापन झालेल्या इंदिरा काँग्रेसच्या ‘पंजा’ या निवडणूक चिन्हाची माहिती इंदिरा गांधी यांनी याच सभेतून लोकांना दिली. १९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत विराट जनसमुदाय पाहावयास मिळाला. विशेष म्हणजे या सभेच्या निमित्ताने ठाकरे यांचा जालन्यात मुक्काम होता. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची मोठी सभा झाली. या सभेत त्यांनी तरूणांची मने जिंकली होती. जनता पार्टीचे चंद्रशेखर, भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याही सभा जालन्यात झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची एक प्रचारसभा झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीही आपल्या वक्तृत्वाने नागरिकांची मने जिंकलेली आहेत. २००९ मध्ये सोनिया गांधी यांची मोठी सभा झाली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची विराट गर्दी. ही गर्दी पाहून स्वत:चे सुरक्षा कडे तोडून सोनियांनी काही महिलांकडून स्वागताची फुले स्वीकारली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, १७ एप्रिल २०१४ रोजी राहुल गांधी यांची सभा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात जालन्यातील सभेद्वारेच प्रचारदौरा सुरू केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभा जालन्यात झालेल्या आहेत. बसपाच्या नेत्या मायावती यांचीही सभा झालेली आहे.