शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

३ वर्षांपासून रखडली कारागृहरक्षक भरती

By admin | Updated: June 14, 2016 00:07 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद हर्सूल मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली कारागृहरक्षक पदाची भरती लालफितीत अडकली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण न करताच प्रशासनाने

बापू सोळुंके , औरंगाबाद हर्सूल मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली कारागृहरक्षक पदाची भरती लालफितीत अडकली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण न करताच प्रशासनाने दोन वर्षांत अन्य दोन वेगवेगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण केल्या. तीन वर्षांपूर्वी कारागृहरक्षक पदासाठी अर्ज केलेले उमेदवार मात्र आमच्या भरती प्रक्रियेचे घोडे कोठे अडले, असा सवाल करीत आहेत. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मात्र कारागृह प्रशासन देत नसल्याने मैदानी चाचणी दिलेले १६ हजार उमेदवार हवालदिल झाले आहेत. राज्यातील हर्सूल हे एक प्रमुख कारागृह आहे. या कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारासह, विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेले हजारो कैदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहाच्या प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा चार पट कै द्यांना तेथे ठेवण्यात आलेले आहे. अशा या महत्त्वाच्या कारागृहातील कारागृहरक्षक पदाच्या २०१ जागा भरण्यासाठी प्रशासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जाहिरात प्रकाशित केली होती. या जाहिरातीनुसार अर्ज दाखल करण्याच्या ६ जानेवारी २०१४ या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे ४० हजारांहून अधिक उमेदवारांनी कारागृह प्रशासनाकडे अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाने १६ हजार ७५८ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पात्र ठरविले. मात्र या उमेदवारांची मैदानी चाचणी तातडीने घेण्यात आली नाही. मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यासाठीही प्रशासनाकडून विशेष काही हालचाली झाल्या नाहीत. या भरती प्रक्रि येशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या आविर्भावातच प्रशासनाचा कारभार सुरू होता. उमेदवारांनी जेव्हा प्रशासनाकडे चकरा मारण्यास सुरुवात केली तेव्हा तब्बल दोन वर्षांनंतर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचणीतील उमेदवारांचे गुण एमकेसीएलने संकेतस्थळावर प्रकाशित केले आहेत. कारागृह प्रशासनाने २०१३ ची भरती प्रक्रिया जैसे थे ठेवली असली तरी नंतर सलग दोन वर्षे वेगवेगळ्या जाहिराती काढून दोन स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रिया पूर्णही करण्यात आल्या. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशासनाने रुजूही करून घेतले. त्यापैकी काही जण प्रशिक्षणाला गेले आहेत, तर काही उमेदवारांचे प्रशिक्षणही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारागृह प्रशासनाने मैदानी चाचणी तब्बल दोन वर्षांनंतर घेतली आता लेखी परीक्षा तातडीने घेतली जाईल, अशी आशा उमेदवारांना होती. मात्र मैदानी परीक्षेला आठ महिने उलटले तरी लेखी परीक्षेबाबत कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे उमेदवार पुन्हा हवालदिल झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.