शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ‘मेगा’ पोलीस भरती

By admin | Updated: March 29, 2016 01:01 IST

औरंगाबाद : शहर पोलीस, कारागृह शिपाई आणि ग्रामीण पोलीस, अशा तिन्ही दलांच्या तब्बल १८८ पदांसाठी भरती प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

औरंगाबाद : शहर पोलीस, कारागृह शिपाई आणि ग्रामीण पोलीस, अशा तिन्ही दलांच्या तब्बल १८८ पदांसाठी भरती प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. तिन्ही दलांसाठी तब्बल ३६ हजार उमेदवारी अर्ज आले आहेत. पोलीस आयुक्तालयातील मैदानावर शहर पोलीस दलाची भरती होणार आहे. ग्रामीण पोलीस दलातर्फे कारागृह शिपाई व ग्रामीण पोलिसांची भरती होणार असून पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील गोकुळ मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शहर पोलिसांनी ८०० पोलिसांचा बंदोबस्त लावला असून ग्रामीण पोलिसांनीही ३०० पोलिसांचा फौजफाटा भरती प्रक्रियेत उतरविला आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पहाटे ५.३० पासून उमेदवारांना मैदानावर घेऊन सकाळी १० वाजेच्या आत मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. याशिवाय उर्वरित उमेदवारांची मैदानी चाचणी रात्रीच्या वेळी विजेच्या प्रकाशात घेतली जाणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस दलातर्फे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. शहर पोलीस दलातर्फे ४३ टेबल पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या ५६ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी ४३ टेबल लावण्यात आले असून आयुक्त अमितेशकुमार या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ५६ पैकी महिलांसाठी २१ तर पोलीस पाल्यांसाठी एक व गृहरक्षकासाठी दोन जागा राखीव आहेत. यासाठी तब्बल १२ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून दहा हजार पुरुष आणि दोन हजार महिलांचे अर्ज आहेत. दररोज दोन हजार उमेदवारांना बोलावण्यात आलेले आहे. ३ पोलीस उपायुक्त, ५ पोलीस सहायक आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, ६० सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच ७०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.