छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील रेकॉर्डब्रेक पाऊस, ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:59 IST2025-09-29T19:58:24+5:302025-09-29T19:59:11+5:30
३५४ जणांना पुरातून वाचविले; अतिवृष्टीने नऊ तालुक्यांना फटका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील रेकॉर्डब्रेक पाऊस, ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद रविवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी झाली. जिल्ह्यात एकाच रात्रीत ११० मि.मी. पाऊस बरसला. यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचविण्यात सुरक्षापथकाला यश आले. त्या सर्वांना सुरक्षित स्थळी हलिवले आहे. दोघांचा शोध सुरू आहे. वैजापूरमधील अंतापूर, नारायणपूरमध्ये बचावकार्य सुरू आहे.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५८१ मि.मी. असून, त्या तुलनेत आजवर ८१८ मि.मी. म्हणजेच १४० टक्के पाऊस झाला. २३७ मि.मी. अतिरिक्त पाऊस यंदा पावसाळ्यात झाला. ६८ मंडळांत ६५ मि.मी.च्या वर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर : शहर परिसर ८७ मि.मी., उस्मानपुरा ८७, भावसिंगपुरा ९९, कांचनवाडी १४२, चिकलठणा ६६, चौका १००, पंढरपूर ८२, पिसादेवी ६६, वरूडकाझी ६६ मि.मी.
पैठण : आडूळ ८७ मि.मी., पैठण शहर ६९, पाचोड ६९ मि.मी.
गंगापूर : शहर १४८ मि.मी., मांजरी १५१, भेंडाळा १५६, शेंदूरवादा ९९, तुर्काबाद १६५, वाळूज १२६, हर्सूल १९६, डोणगाव १९३, सिद्धनाथ १५०, आसेगाव ११८, गाजगाव १५०, जामगाव १४८ मि.मी.
वैजापूर : शहर : १७४ मि.मी., खंडाळा १७२, शिऊर १८९, बोरसर १८९, लोणी १७२, गारज १५१, लासूरगाव १२७, महालगाव १७३, नागमठाण १७३, लाडगाव १७३, नायगाव १६४, जानेफळ १७५, भाटतारा १७१ मि.मी.
कन्नड : शहर १३५ मि.मी., चापानेर १३५, देवगाव १६६, चिकलठाण ११७, पिशोर १२६, नाचनवेल १२५, चिंचोली १२०, करंजखेड १३९, नागरद ८५ मि.मी.
खुलताबाद : वेरूळ १८० मि.मी., सुलतानपूर ११०, बाजार १०५ मि.मी.
सिल्लोड : शहर १५९ मि.मी., निल्लोड १२२, भराडी ९०, गोळेगाव ७१, अजिंठा ७१, आमठाण ७८, बोरगाव ७८, अंबई ७८, पालोद ७४, शिवना ७१, उंडणगाव ७१ मि.मी.
सोयगाव : शहर ६८, बनोटी १०३, जरांडी ६६ मि.मी.
फुलंब्री : शहर १२६ मि.मी., आळंद ११३, पीरबावडा १०९, वडोदबाजार १२१, बाबरा १३१ मि.मी.
एकाच रात्रीत किती बरसला?
तालुका.................... झालेला पाऊस
छत्रपती संभाजीनगर...... ७५ मि.मी.
पैठण..........................५७ मि.मी.
गंगापूर....................१५० मि.मी.
वैजापूर..................१६९ मि.मी.
कन्नड.....................१२७ मि.मी.
खुलताबाद..............१३१ मि.मी.
सिल्लोड................८७ मि.मी.
सोयगाव...............७१ मि.मी.
फुलंब्री..................१२० मि.मी.
एकूण...................११० मि.मी.