शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विकसित होणाऱ्या भागांसाठीचे रेडी रेकनर वाढले

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

शिरीष शिंदे , बीड बांधकाम व्यवसायात मंदीचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात ६ टक्के वाढ केली असल्याचे जाहीर केले.

शिरीष शिंदे , बीडबांधकाम व्यवसायात मंदीचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात ६ टक्के वाढ केली असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र शहरातील विकसित होणाऱ्या भागांचे रेडी रेकनर दर जवळपास १० ते ११ टक्क्यांनी वाढले असल्याचे बाजार मूल्य दर तक्त्यावरून समोर आले आहे. त्यामुळे घर, फ्लॅट खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरच आहे.१ एप्रिलपासून नवीन बाजार मूल्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली होती. शासन स्तरावर याचा कायम पाठपुरावा केला गेला. मागणीप्रमाणे नवीन रेडी रेकनर दरामध्ये जुन्या भागामधील रेडी रेकनरनंतर फारसे वाढविले गेले नाहीत. ते दर ६ ते ७ टक्क्यांच्या आसपास आहेत. मात्र, यात शासनाने एक मेख मारली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमधील मोकळ्या जागा आता फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरालगत असणारे भाग झपाट्याने विकसित होत आहेत. त्या ठिकाणी रो-हाऊसेस, फ्लॅटचे बांधकाम दुष्काळात जोरात सुरू आहे. मुख्य भागामध्ये प्रॉपर्टीचे फारसे व्यवहार होत नाहीत. मात्र विकसित होणाऱ्या भागांमध्ये नियमित व्यवहार सुरू असतात. गुंतवणूक म्हणून फ्लॅट किंवा रो-हाऊस खरेदी करतात. हा धागा पकडत शासनाने शहरालगत असणाऱ्या प्रॉपर्टीचे रेडी रेकनर दहा ते अकरा टक्क्यांच्या जवळपास ठेवले आहेत.पांगरी रोड ते न.प. हद्द परिसरातील मोकळ्या जागेचे पूर्वीचे दर ८०५० रुपये होते, ते आता ८९०० झाले आहेत. तसेच कॅनॉल रोड म्हणजेच नगर रोड ते शिंदे कॉलनी परिसरानंतर असणाऱ्या मोकळ्या जागेचे दर ११ हजार रुपये, तर निवासी जागांचे दर २२ हजार रुपये आहेत.मोंढा रस्ता भागातील मोकळ्या जागांचे दर १५२००, तर निवासी जागांचे दर २६ हजार रुपये, शिवाजी पुतळा ते एस.टी. स्टँड परिसर २४७५० हे खुल्या, तर ३५,२०० रुपये निवासी जागांचे दर असे जिल्हा मुद्रांक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस.एच. गोपवाड म्हणाले.