रामदेवजी महाराज जयंती मिरवणूक
By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:39:00+5:302014-09-04T00:55:52+5:30
औरंगाबाद : श्री भगवान रामदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी जलकलश आणि महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.

रामदेवजी महाराज जयंती मिरवणूक
औरंगाबाद : श्री भगवान रामदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी जलकलश आणि महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शोभायात्रा श्री भगवान रामदेवजी महाराज मंदिर, रामदेवनगर, पदमपुरा येथून काढण्यात आली. यात्रा क्रांतीचौक, पैठणगेट, औरंगपुरा मार्ग पदमपुरा येथे विसर्जित करण्यात आली.
यात्रेत सजविलेला रथ आणि लहान मुलांचा सजीव देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यात्रेनंतर सायंकाळी ४ वाजता ध्वजवंदन, ७ वाजता महाआरती केल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.