शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ

By admin | Updated: April 17, 2015 00:43 IST

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मातब्बरांनी पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पेच वाढला आहे

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मातब्बरांनी पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पेच वाढला आहे. गुरुवारी पक्षांतर्गत निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवनराव गोरे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे इच्छुक १६ जणांची नावे घेऊन ते परतले. आता बारामतीदरबारीच फैसला होणार आहे.अशोक डक हे २००७ पासून जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. सलग तीन टर्म त्यांनी कारभार पाहिला. दर तीन वर्षानंतर पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीचा नियम आहे. त्यानुसार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्यपातळीवरील कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारी बीड जिल्हाध्यक्ष निवडीचे नाव निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांना पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धाडले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी अशोक डक यांनाच पुन्हा जिल्हाध्यक्षपद द्यावे, असा सूर उमटला होता. मात्र, माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी दावा केला. त्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली. त्यामुळे गोरेंपुढे पेच निर्माण झाला. शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. आता बारामतीदरबारी कोणाच्या नावाची जादू चालते? यावरच भावी जिल्हाध्यक्ष अवलंबून आहे.यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस, प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, माजी आ. उषा दराडे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, युवक राष्ट्रवादीचे अ‍ॅड. शेख शफिक, अक्षय मुंदडा, भाऊसाहेब नाटकर यांची उपस्थिती होती.गटबाजीचे दर्शन!जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षपदांसाठी प्रमुख नेत्यांकडून नावे मागवून घेतली तेंव्हा एका तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गटांची नावे आली. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांच्या गटाने जिल्हाध्यक्षपदाकरता दोन नावे सूचविली तर माजी आ. बदामराव यांनी स्वत:चे नाव पुढे केले आहे. केजमध्ये अक्षय मुंदडा यांनी दोन नावे दिली तर माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी स्वत:साठीच जोर लावला आहे. माजलगावात माजी मंत्री प्रकाश सोळंके व विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्यातच चढाओढ आहे. बीड, आष्टी या मतदारसंघातून मात्र अनुक्रमे आ. जयदत्त क्षीरसागर व माजीमंत्री सुरेश धस यांच्याकडूनच इच्छुकांची नावे आली आहेत. (प्रतिनिधी)