शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST

भास्कर लांडे, हिंगोली मराठवाड्यात मान्सूनने हजेरी लावली नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली आहे.

भास्कर लांडे, हिंगोली
मराठवाड्यात मान्सूनने हजेरी लावली नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली आहे. त्यातच ‘मृगा’प्रमाणे आर्द्रा नक्षत्राची सुरूवात कोरडी झाल्याने मूग आणि उडीदाच्या पिकाची आशा उरलेली नाही. आधीच खत-बियाणांसाठी लाखो रूपये खर्च करून मोकळे झालेले शेतकरी पावसाचा धावा करीत आहेत. विशेषत: हिंगोली तालुक्यातील ९ गावांत दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
मराठवाड्यात ७७९ मिलिमीटर एवढा सरासरी पाऊस पडतो. गतवर्षी आठही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. प्रामुख्याने नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. गतवर्षी या दिवसांत जमिनीच्या बाहेर पाणी निघाले होते. २५ जूनपर्यंत २० टक्के म्हणजे १५९.२९ मिमी पाऊस पडला होता. प्रामुख्याने त्यात २०७ मिमीचा आकडा ओलांडून सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यात पडला होता. गतवर्षी या दिवसांत पावसाचा कहर सुरू असताना यंदा विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाचे आगमन झाल्यानंतर यंदा लवकर पेरणी आटोपण्याची आशा उत्पादकांना लागली होती; परंतु यंदा मराठवाड्यात मृगापासून २० दिवसांत केवळ २९.२३ मिमी पाऊस झाला. मृगाच्या प्रारंभानंतर गायब झालेला पाऊस आर्द्रा नक्षत्र सुरू होवून चार दिवस उलटत असतानाही दर्शन देण्याचे नाव घेत नाही. आजपर्यंत १२६.४१ मिमीची अपेक्षित सरासरी असताना पावसाने तिशी ओलांडलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी पहिल्यांदा २०० मिमीचा टप्पा ओलांडणाऱ्या हिंगोली जिल्ह्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. मागील वर्षी पावसाने कहर केला असताना यंदा शेतातील ढेकूळ देखील विरघळले नाही. आजमितीला पडलेल्या २१.९१ मिमी पावसाने उत्पादकांची माती केली. कारण काही गावांत सुरूवातीला पेरलेली पिके आज वाळून जात आहेत. परिणामी जिल्ह्यात अनेक उत्पादकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. याहीपेक्षा विहिरी, बोअर कोरड्या पडण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांचा चारा संपत आल्याने जनावरांचे पोट पाठीला लागले आहे. व्यापाऱ्यांनी उत्पादकांना उधारी देणे बंद केले आहे. पाण्याअभावी उत्पादकांचे हाल सुरू झाले आहेत. परिणामी मान्सूनच्या पाण्याऐवजी उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
नऊ गावांमध्ये दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला काही गावांत पाऊस झाल्याने उत्पादकांनी थेट पेरणीला सुरूवात केली होती. त्यात हिंगोली तालुक्यातील आंबाळा-७० टक्के, आंबाळा तांडा-७०, बोंडाळा, वेलूरा, वडद, एकांबा, भिंगी, फाळेगाव, आडगावात अनुक्रमे ४० टक्के पेरण्या झाल्या आहेत; परंतु पावासाने दडी मारल्याने निघालेली पिके वाळण्यास सुरूवात झाली आहे. लाखो रूपये खर्च करून महागामोलाची खत-बियाणे वाया जाण्याची वेळ आली आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर खेळलेला जुगार उत्पादकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. परिणामी लाखो रूपयांना बुडाल्याची भावना अंबाळा येथील नामदेव इंगोले, नामदेव लांडगे, नारायण इंगोले, अशोक भिसे, कडुजी इंगोले, भीमा भिसे, धम्मराज सावंत, विलास भिसे, पृथ्वीराज सावंत, झनक भिसे यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यात जिल्हानिहाय पडलेला पाऊस
जिल्हा सरासरीअपेक्षित पडलेला गतवर्षी पा. औरंगाबाद ६७५.४५११३.९१८.४४१६२.२
जालना ६८८.३२१२०.३६१८.६६१६५.२७
परभणी ७७४.५९१०९.७३३३.४३१३०.५६
हिंगोली ८९२.७६१४६२१.९१२५२.०९
नांदेड ९५५.५५१४२.८६२५.३४१९५.४६
बीड ६६६.६७११०.९६३१.३८१३२.५६
लातूर ८०२.१३१२५.९४५०.६८१२८.९१
उस्मानाबाद ७७६.८३१४१.५२३४.२१०७.४६
एकूण ७७९१२६.४१२९.२३१५९.२९