शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंग प्रकरणात होऊ शकते शिक्षा

By admin | Updated: August 30, 2014 00:00 IST

परभणी : रॅगिंगसारख्या गुन्ह्यामध्ये आरोपीस किंवा त्याच्या पाठिशी घालणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंडाची तरतूद आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जे.एन.कातडे यांनी दिली.

परभणी : रॅगिंगसारख्या गुन्ह्यामध्ये आरोपीस किंवा त्याच्या पाठिशी घालणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंडाची तरतूद आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जे.एन.कातडे यांनी दिली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या वतीने नुकतेच कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, रॅगिंग कायदा, संगणक, इंटरनेटविषयक कायदा, शिक्षणाचा अधिकार, बालगुन्हेगारी आदींविषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश एस.एस.सय्यद हे होते. प्रास्ताविक ज्ञानोपासक महाविद्यालयाचे डॉ.सुनील शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अधीक्षक पी. व्ही. काळे यांनी केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक जे.एन.कातडे, डब्ल्यू.एस.वाघमारे, जीवन पेडगावकर, एम.जे. बोबडे, के.एम.मोरे, प्राचार्य पी.एल.मोरे, प्रा.एम.एन.सोंडगे, प्रा.डॉ.सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅगिंग कायदेविषयक माहिती देताना कातडे यांनी रॅगिंग कशी केली जाते, याची माहिती सोप्या भाषेत दिली. मोठ्या शहरांममध्ये इंजिनिअरिंग, वैद्यकीय, एम.बी.ए.अशा महाविद्यालयामध्ये हे प्रकार होतात. रॅगिंग म्हणजे एखाद्या महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश केला तर त्या महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थी पायात सतत बूुट घालून ठेवण्यास सांगतात, विचित्रपणे टाँन्ट मारणे, मानसिक, शारीरिक छळ करणे हे कृत्य रॅगिंग कायद्यात मोडते. असे कृत्य होत असेल तर तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा १०९१ या हेल्पलाईनवर विनामूल्य सेवा दिली जाते, असे त्यांनी सांगितले. डॉ. डी.एस. रामढवे यांनी तंबाखूचे दुष्परिणाम, अ‍ॅड.जीवन पेडगावकर यांनी सायबर कायदा, अ‍ॅड.बोबडे यांनी शिक्षणाचा हक्क कायदा, अ‍ॅड. वाघमारे यांनी बालगुन्हेगारी याविषयी मार्गदर्शन केले. के.एम. मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सह.दिवाणी न्यायाधीश एस.एस.सय्यद म्हणाले, आपण कायद्याचे पालन करावे व एक चांगला समाज घडविण्यासाठी योगदान द्यावे. चांगला समाज घडला तर शहर, गाव आणि पर्यायाने तालुक्याची, जिल्ह्याची व राष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.