शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या हक्काचे प्रश्न विधान परिषदेत मांडले

By admin | Updated: June 18, 2014 01:36 IST

नजीर शेख , औरंगाबाद सिंचन किंवा बांधकाम विभागातील कोणताही मुद्दा मी विधान परिषदेत उपस्थित केला असल्यास मी निवडणुकीतून माघार घेईन, असे विधान आ. सतीश चव्हाण यांनी केले.

नजीर शेख , औरंगाबादमराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नाशिवाय सिंचन किंवा बांधकाम विभागातील कोणताही मुद्दा मी विधान परिषदेत उपस्थित केला असल्यास मी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेईन, असे विधान मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केले. पदवीधरांपेक्षा सिंचन व बांधकाम विभागातील मुद्यांकडे जास्त लक्ष दिल्याचा मुद्दा आ. चव्हाण यांनी आत्मविश्वासपूर्वक खोडून काढतानाच आपण गेल्या सहा वर्षांत सरकारी कर्मचारी, शिक्षक, वकील, डॉक्टर तसेच बेरोजगार तरुण या सर्वांसाठी भरीव काम केले असल्याचे स्पष्ट केले. शिक्षकांशी संबंधित निर्णय घेताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत मिळाली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रश्न समजावून घेऊन त्या-त्या खात्याच्या मंत्र्यांकडे बैठका लावल्या. त्यांना मदत होईल, अशी भूमिका शासनाला घ्यायला लावली. डॉक्टरांसाठी वेगळा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. हा कायदा करण्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे मीदेखील आग्रह धरला होता. स्वतंत्र प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर जाचक अटी लागू करू नयेत, अशी आमची भूमिका आहे. वकिलांच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास विधि विद्यापीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करण्यासाठी मी पाठपुरावा केला आहे. सध्या राज्यात चालू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाबाबतच्या वादाचा परिणाम होईल का? या प्रश्नावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. परंपरेने हा मतदारसंघ भाजपाचा होता. तो मागच्या वेळी काँग्रेसच्या मदतीने आम्ही खेचून आणला. यावेळीही काँगे्रसची सर्व नेतेमंडळी माझ्यासोबत आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिळालेल्या यशाचाही या निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.यावेळी नवमतदार कुठे जातील? या प्रश्नावर आ. चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शहरी मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर आला; परंतु विधान परिषदेत पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी मतदार होता येते. त्यामुळे हा मतदार किमान २५ वर्षांचा असतो. १८ वर्षांच्या नवमतदाराचा मुद्दा येथे लागू होत नाही. लोकसभेच्या वेळी नवमतदारांनी मोदी यांना मत दिले. विधान परिषदेला मतदान केल्याने काही मुख्यमंत्री बदलत नाही. त्यामुळे हा सुशिक्षित मतदार विचार करून मतदान करतो. बेरोजगारांच्या मुद्यावर आ. चव्हाण म्हणाले की, राज्यात बेरोजगारांना सरकारी नोकऱ्यांत सामावून घेणे अशक्य आहे. त्यासाठी उद्योग हाच मार्ग आहे. येथे उद्योग येण्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मराठवाड्यातील सर्व जिल्हे हे चारपदरी मार्गाने जोडले पाहिजेत. रेल्वेमार्गही मार्गी लागले पाहिजेत. औरंगाबादेत डीएमआयसीच्या माध्यमातून पाच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येथे मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. औरंगाबाद वगळता मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांत राज्य शासनाने उद्योगांसाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे. येथे उद्योग आल्यास त्यापासून राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुलाच्या प्रमाणात जमिनीची किंमत काहीच नसेल. ईबीसी सवलतीची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत न्यावी तसेच मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आ. चव्हाण यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. मागील वेळी शिवसेनेचा उमेदवार असल्याने भाजपाचा पराभव झाला. या मुद्याचेही आ. चव्हाण यांनी खंडण केले. माझ्याविरोधातही गतवेळी विठ्ठल मोरे किंवा समविचारी लोक उभे होते. त्यांनीही आमची मते खाल्ली होती. त्यामुळे आम्ही गेल्यावेळी निर्भेळ जिंकलो.