शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यावरण संतुलित ग्राम’चा तपासणी अहवाल दडविला

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

हिंगोली : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केल्यानंतर अधिकार्‍यांनी दिलेला अहवाल जिल्हा परिषदेकडून दडविला जात आहे.

हिंगोली : राज्य शासनाने सुरू केलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केल्यानंतर या बाबत संबंधित अधिकार्‍यांनी दिलेला अहवाल जिल्हा परिषदेकडून दडविला जात असून हा अहवाल बाहेर येवू नये, याची जि.प. प्रशासनाच्या वतीने पुरेपूर काळजी घेतली जात आहे. महाराष्टÑ राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आॅगस्ट २०१० पासून राज्यभर पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सुरू करण्यात आली. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करूनच समृद्ध व संपन्न गावाची निर्मीती करण्याच्या दृष्टीकोणातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेला राज्य शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला. उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे, पर्यावरणाचे भान ठेवून नैतिक सुविधा उपलब्ध करणे, ईको व्हिलेजची संकल्पना राबवून समृद्ध ग्राम निर्माण करणे, आदी उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, जल व्यवस्थापन, जलस्त्रोताचे रक्षण, जमीन व्यवस्थापन, वन व्यवस्थापन, जैविक विविधता संवर्धन आदी कामे करावयाची आहेत. या योजनेंतर्गत १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येक वर्षी १० लाख रुपये, तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींना प्रति वर्षी १२ लाख रूपये, ७ ते १० हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ना प्रति वर्षी ८ लाख रुपये निधी दिला जातो. तसेच ५ ते ७ हजार लोकसंख्येच्या ग्रा.पं.ना दरवर्षी ५ लाख, २ ते ५ हजार लोकसंख्येच्या गावांना दरवर्षी ४ लाख, १ ते २ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ना प्रत्येक वर्षी ३ लाख आणि १ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ना दरवर्षी २ लाख रुपयांचा निधी काही निकषांच्या आधारे दिला जातो. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना जि.प.ने गतवर्षी निधी दिला. त्या अंतर्गत किती ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले? तसेच मिळालेल्या निधीतून काय कामे करण्यात आली? या बाबतची तपासणी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने ऐन लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पाचही तालुक्यातील प्रत्येकी दोन प्रातिनिधीक गावांची तपासणी करण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती केली होती. यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. लोणे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कुंभारगावे आदींचा समावेश होता. या अधिकार्‍यांनी त्यांना दिलेल्या तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची प्रातिनिधीक स्वरुपात तपासणी केली. त्यामध्ये कोणत्या गावामध्ये किती झाडे जीवंत आहेत? किती झाडे लावण्यात आली. या बाबतचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पंचायत विभागामार्फत एप्रिलमध्येच देण्यात आला; परंतु हा अहवाल मात्र बाहेर जावू नये याची जिल्हा परिषदेकडून खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अहवालाचे एकत्रिकरण करणे बाकी असल्याचे सांगितले. तर या विभागाचे काम पाहणारे विस्तार अधिकारी गोरे यांनीही हेच उत्तर दिले. या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही डॉ. राठोड यांच्याप्रमाणेच अहवालाचे एकत्रिकरण झाले नसेल. संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर माहिती सांगतो, असे सांगुन वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही या बाबत गुप्तता पाळली जात असल्यामुळे या अहवालाविषयी संशय निर्माण होत आहे. तपासणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांनी या मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले की काय? असाही सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने काही महिन्यांपुर्वी ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकण्यासाठी ७ लाख रूपये खर्च करून ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी सोडीयम हायड्रोक्लोराईड हे रसायन खरेदी केले होते. हे रसायन साथ रोग उदभवल्यास वापरले जाते. अत्यंत महागडे असणारे हे रसायन खरेदी केल्याने जिल्हा परिषदेला मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणाचाही चौकशी करण्याची तसदीही जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या चाललेय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील प्रत्येकी दोन गावांची अधिकार्‍यांच्या पथकामार्फत करण्यात आली होती प्रातिनिधीक तपासणी तपासणीमध्ये पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत किती झाडे लावण्यात आली? त्यापैकी जीवंत झाडे किती आहेत? या बाबतची देण्यात आली माहिती पाच तालुक्यांमधून आलेल्या अहवालाचे एकत्रिकरण झाले नसल्याचे सांगुन माहिती देण्यास अधिकार्‍यांची टोलवाटोलव माहिती दडपून ठेवली जात असल्याने निर्माण होवू लागला संशय यापुर्वी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी ठेवलेल्या ७ लाख रुपयांच्या निधीतून महागडे सोडियम हायड्रोक्लोराईड हे रसायन करण्यात आले होते खरेदी जि.प.चा तोटा झाला असतानाही या बाबतच्या चौकशीकडे झाले दुर्लक्ष