छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रोझोन मॉल आता ‘इनऑर्बिट मॉल’ म्हणून ओळखला जाईल. एपीआय कॉर्नर येथील आणि कोइंबतूरमधील प्रोझोन मॉल्सचा ‘इनऑर्बिट मॉल्स’ सोबत सुमारे १३०० कोटी रुपयांत सौदा करण्यात आला आहे. रिटेल क्षेत्रातील शहरातील हा सर्वांत मोठा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.
ऑक्टोबर २०१० मध्ये हा मॉल सुरू झाला. के. रहेजा कॉर्प समूहाची उपकंपनी असलेल्या इनऑर्बिट मॉल्सने रिटेल रिअल इस्टेट क्षेत्रातील विस्तारांतर्गत प्रोझोन रिॲलिटी समूहाच्या दोन महत्त्वाच्या मॉल्ससोबत करार केला आहे. हे मॉल्स छत्रपती संभाजीनगर आणि कोइंबतूर येथे स्थित आहेत. या व्यवहाराची किंमत अंदाजे १३०० कोटींच्या दरम्यान आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या व्यवहारामुळे ‘इनऑर्बिट मॉल्स’च्या मालकीत एकूण रिटेल स्पेसमध्ये सुमारे १.२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्राची भर पडणार आहे. ‘इनऑर्बिट मॉल्स’ सध्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, हैदराबाद आणि वडोदरा यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आहे. रिटेल क्षेत्रातील वाढती मागणी, वाढता ग्राहकवर्ग आणि शहरीकरणाचा वेग या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. ‘प्रोझोन रिॲल्टी’ सध्या आर्थिक संकटात आहे. वाढता कर्जबोजा, रोख प्रवाहातील अडचणी आणि नफ्यातील घसरण या कारणांमुळे कंपनी आपली मालमत्ता विक्री करून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
तीन महिन्यांत व्यवहार पूर्णआम्ही ‘इनऑर्बिट मॉल्स’ सोबत प्रोझोन मॉल्सचा सौदा केला आहे. पुढील तीन महिन्यांत शेअर्स व इतर बाबींचे व्यवहार पूर्ण होतील.-निखिल चतुर्वेदी, मालक प्रोझोन मॉल
या व्यवहाराचे फायद्यासह तोटेही...या व्यवहारातून मोठी उलाढाल झाली, हे चांगले आहे. इनऑर्बिट मॉल्स कंपनी टियर-२ शहरांमध्ये विस्तार करत आहे, ही येथील रिटेल क्षेत्रासाठी फायद्याची बाब आहे. परंतु याचे काही तोटेदेखील आहेत. येथील मायक्रो इकॉनॉमीला यामुळे धक्का बसू शकतो. आपले टियर :३ मधून टियर-२ मध्ये जात आहे. हा फायदा आहे. मॉल वाढले, ऑनलाईन वाढले की, स्थानिकांच्या व्यवसायासमोर आव्हाने वाढतात.-मुकुंद कुलकर्णी, सीएमआयए, माजी अध्यक्ष
रोजगाराच्या संधी वाढतीलव्यवहाराला कंपन्यांच्या संचालक मंडळाची मान्यता मिळाली असून, पुढील टप्प्यात नियामक संस्था आणि भागधारकांची मंजुरी आवश्यक असणार आहे. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. नव्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढतील. शहराच्या रिटेल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा होईल.
Web Summary : Prozone Mall in Chhatrapati Sambhajinagar sold to Inorbit Malls for approximately ₹1300 crore. The deal, expected to be completed in three months, marks a major retail transaction. Inorbit expands its footprint, while Prozone Realty addresses financial challenges. The move is expected to boost retail infrastructure and create jobs.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर का प्रोज़ोन मॉल लगभग ₹1300 करोड़ में इनऑर्बिट मॉल्स को बेचा गया। तीन महीने में सौदा पूरा होने की उम्मीद है। इनऑर्बिट का विस्तार, प्रोज़ोन की वित्तीय चुनौतियों का समाधान। खुदरा बुनियादी ढांचे को बढ़ावा और रोजगार सृजन की संभावना है।