औरंगाबाद जिल्ह्यात समृद्ध महामार्गाचे काम ६० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:53+5:302021-02-05T04:11:53+5:30

- औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग गेला आहे. - या महामार्गावर काँक्रिटचे दोन थर असतील. आजघडीला ११२ ...

Prosperous highway in Aurangabad district is 60 percent complete | औरंगाबाद जिल्ह्यात समृद्ध महामार्गाचे काम ६० टक्के पूर्ण

औरंगाबाद जिल्ह्यात समृद्ध महामार्गाचे काम ६० टक्के पूर्ण

- औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग गेला आहे.

- या महामार्गावर काँक्रिटचे दोन थर असतील. आजघडीला ११२ किलोमीटरपैकी काॅंक्रिटीकरणाचा खालचा थर (बेसमेंट) ७४ किलोमीटर तर वरचा थर (फिनिशिंग) ५५ किलोमीटर एवढा पूर्ण झाला आहे.

- जिल्ह्यात सावंगीच्या पूर्वेला बोगद्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातून २९० मीटर लांबीचा हा एक बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.

- सावंगी, माळीवाडा, शेंद्रा एमआयडीसी, हडस पिंपळगाव, जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज उभारले जात आहेत.

- प्राण्यांसाठी २ ठिकाणी ओव्हरपास, तर ३ ठिकाणी अंडरपास आहेत.

- जिल्ह्यात महामार्गालगतच्या गावांमधील पादचाऱ्यांसाठी, वाहनांसाठी व प्राण्यांसाठी एकूण २२० अंडरपास उभारले जाणार आहेत.

- जिल्ह्यातून औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यातील ७१ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे.

- या महामार्गावर इस्पितळे, शीतगृहे, हॉटेल्स, नवीन शहरे, कौशल्य विकास शैक्षणिक केंद्रे या बाबी प्रस्तावित असून, लवकरच त्यांचे काम सुरु होईल.

कॅप्शन:

औरंगाबाद शहराजवळ सावंगीच्या पूर्वेला असलेला डोंगर पोखरुन समृद्धी महामार्गावर २९० किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.

औरंगाबाद - सिल्लोड समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

Web Title: Prosperous highway in Aurangabad district is 60 percent complete