केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जासाठी प्रस्ताव

By Admin | Updated: August 17, 2014 01:44 IST2014-08-17T01:37:08+5:302014-08-17T01:44:55+5:30

औरंगाबाद : विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा ठराव उस्मानाबाद उपकेंद्र येथे झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

Proposal for the status of Central University | केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जासाठी प्रस्ताव

केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जासाठी प्रस्ताव

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा ठराव उस्मानाबाद उपकेंद्र येथे झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्र येथे आज शनिवारी व्यवस्थापन परिषदेची तहकूब सभा घेण्यात आली.
या सभेत या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी ठराव मंजूर करून त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावावर राज्य सरकार व केंद्र सरकारमार्फत लवकर हालचाली व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Web Title: Proposal for the status of Central University