शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:32 IST

दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्केव्याज माफीची योजना सुरू केली. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाºयांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजप्तीनंतर थेट लिलाव : १ फेबु्रवारीपासून मनपा थकबाकीदारांचा आवळणार फास

औरंगाबाद : दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्केव्याज माफीची योजना सुरू केली. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाºयांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.चालू आर्थिक वर्षात शहरातील अडीच लाख मालमत्ताधारकांकडून ४५० कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. मागील दहा महिन्यांमध्ये मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी फक्त ७८ कोटी रुपये आले. मालमत्ताकराच्या थकबाकीचा आकडा ५५० कोटींहून अधिक आहे. जास्त वसुली करण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पावले उचलली आहेत. नियमित मागणी वॉर्ड कार्यालये वसूल क रीत आहेत. बड्या थकबाकीदारांसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यांना रोजच्या रोज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. दंड व व्याजाच्या रकमेत सूट देण्याची योजना आतापर्यंत तीनदा राबविण्यात आली. थकबाकी भरण्यासाठी मालमत्ताधारक अजिबात प्रतिसाद देत नाहीत. आर्थिक वर्ष संपत आले असताना उद्दिष्टांच्या फक्त १७ टक्के वसुली आहे. सर्व उपाययोजना करूनही तिजोरीत चार पैसे येण्यास तयार नाहीत. १२ जानेवारीपासून मनपाने सुरू केलेल्या ५० टक्के व्याज माफीत फक्त ४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर योजनेला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.हतबल झालेल्या प्रशासनाने मालमत्ताधारकांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. तीत त्यांनी वसुलीचा आढावा घेतला. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याची सूचना त्यांनी केली. महापालिका आतापर्यंत केवळ जप्तीच्या कारवाया करीत होती. जप्त मालमत्ता थकबाकी भरल्यानंतर परत केली जात होती. मात्र यापुढे मालमत्तांचा लिलाव करून थकीत रक्कम वसूल केली जाणार आहे.----------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर