शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

पेपर मूल्यांकनावर प्राध्यापकांचा बहिष्कार

By admin | Updated: June 15, 2014 00:36 IST

नांदेड : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत पदवी परीक्षेच्या पेपरचे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांनी शनिवारी विष्णूपुरी येथील सहयोग सेवाभावी

नांदेड : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत पदवी परीक्षेच्या पेपरचे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांनी शनिवारी विष्णूपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्या केंद्रावर मानधनातून ३० टक्के टीडीएस कपातीच्या धोरणाचा निषेध करीत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला़ त्यामुळे या केंद्रावर एकच गोंधळ उडाला़ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत सहयोग सेवाभावी संस्था येथे बी़ ए़, बी़ कॉम़ च्या पेपरचे मूल्यांकन ६ जूनपासून सुरू आहे़ पेपर तपासणीच्या कामासाठी नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील ५०० हून अधिक प्राध्यापक नियुक्त केले आहे़ यामध्ये घड्याळी तासिकावर काम करणारे व विद्यापीठाचे समंत्रक असणाऱ्या प्राध्यापकांचा समावेश आहे़ पेपर मूल्यांकनाचे काम चार केंद्रांवर सुरू आहे़ एका पेपरच्या मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना प्रति १० रूपये विद्यापीठाकडून देण्यात येते़ बाहेर गावाहून येणाऱ्या प्राध्यापकांना अडीचशे तर स्थानिक प्राध्यापकांना शंभर रूपये भत्ता देण्यात येतो़ पेपर तपासणीच्या एकूण मानधनातून ३० टक्के टीडीएस (पॅनकार्डधारकांसाठी १० टक्के ) कपात करण्याचे धोरण जाहीर केल्यामुळे शनिवारी सर्वच प्राध्यापकांत असंतोष पसरला़ या निर्णयाचा निषेध करीत प्राध्यापकांनी पेपर मूल्यांकनास नकार दिला़ सकाळी दहा वाजल्यानंतर ५०० प्राध्यापकांनी संस्थेच्या प्रांगणात एकत्र येऊन मुक्त विद्यापीठाच्या धोरणाचा विरोध केला़ हा निर्णय मागे घेणार नाहीत, तोपर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार राहील, अशी भूमिका प्राध्यापकांनी घेतली़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ दुपारी २ नंतर सहायक कक्ष अधिकारी भुपेश गुल्हाने यांनी भेट दिली़ प्राध्यापकांसोबत चर्चा करून गुल्हाने यांनी जे प्राध्यापक पूर्णवेळ सेवेत आहेत, अशांनाच टीडीएस लागू करण्यात आला आहे़ मात्र घड्याळी तासिकावर काम करणारे व विद्यापीठाचे समंत्रक असणाऱ्या प्राध्यापकांना टीडीएस मधून वगळण्यात आल्याचे गुल्हाने यांनी सांगितले़ यावेळी प्रा़ महेश मगर, प्रा़ संदीप काळे, प्रा़ आझादे, प्रा़ डी़ एस़ मुळे, प्रा़ वाय़ यु़ जोशी, एस़ जी़ जाधव, एस़ एस़ शेंबाळे, पी़ डी़ शिंदे, सीमा भोसले, जे़ एऩ सोनाळे उपस्थित होत़ (प्रतिनिधी)मुक्त विद्यापीठाच्या पेपर मूल्यांकनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांचे टीडीएस कपात करण्याविषयी विद्यापीठाकडून पत्र आले आहे़ मात्र यामधून घड्याळी तासिकावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वगळण्याची आमची भूमिका आहे़ तसे विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे़ - डा़ॅ़ आत्माराम टेंगसे, विभागीय संचालक़ नांदेड विभाग़