शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाराती' रुग्णालयात ‘एएसव्ही’ लसींचा तुटवडा

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात , प्राथमिक आरोग्य केंद्रांतही साप, कुत्रे, मांजर, डुकर चावल्यास दिली जाणारी लस उपलब्ध नाहीत.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईस्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्षभरापासून तर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही साप चावल्यास दिली जाणारी अँटी स्नेक व्हायरस (ए.एस.व्ही.) त्याचप्रमाणे कुत्रे, मांजर, डुकर चावल्यास दिली जाणारी लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. ही लस उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही लस बाजारातून खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड नातेवाईक निमूटपणे सहन करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या दाहकतेमुळे जमिनीत राहणारे साप जमिनीबाहेर निघाल्याने सर्पदंशाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मे व जून महिन्यात जवळपास पंचवीस ते तीस रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले अंबाजोगाई तालुक्यातून व परिसरातून रुग्ण मोठ्या आशेने धावत स्वारातीमध्ये दाखल होत आहेत. साप चावल्याचे रुग्ण, कुत्रे, मांजर, रानडुकरासारखे प्राणी चावलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत खरे, पण उपचारासाठी लागणाऱ्या लस मात्र उपलब्ध नाहीत. अशा स्थितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून जवळपास एक वर्षापासून एएसव्हटी साप चावल्यास दिली जाणारी लस स्वारातीला प्राप्त झाली नाही. अशीच अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रांची असून खाजगी मेडिकलमध्ये अपुरा स्टॉक व शासनाच्या रुग्णालयातही औषध उपलब्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून रुग्णांना इतरत्र उपचारासाठी हलवावे लागत असून ९८० रुपयाला १० एमएल मिळणारी ही लस एका रुग्णाला एक देऊन भागत नाही. एका रुग्णाला एका दिवसात एकावेळी पाच याप्रमाणे दिवसात पंधरा लस द्याव्या लागतात. एका दिवसाला १४,७०० रुपये लागतात. ही लस तीन दिवस दिली तर ४४,१०० रुपये खर्च येतो. पाच दिवस दिली तर ७३,५०० रुपये आणि सात दिवस दिली तर १ लाख २९०० रुपये खर्ची पडतात. ही बाब सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक संकटात टाकणारी असून, एवढे करूनही सहजासहजी लस उपलब्ध होत नसल्याने रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. या गंभीर बाबींचा विचार राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने करून शासकीय रुग्णालयात ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील, संजय जड, सुनिल मुंदडा, तानाजी देशमुख, यांनी केली आहे .रुग्णसेवा देण्यासाठी प्रशासन अद्याप सक्षम बनले नसल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत आदनाक यांनी केला. तसेच रुग्णालयात अत्याधुनिक उपचार प्रणाली एंडोस्कोपी, बायपास, अँजियोग्राफीसारख्या सुविधा अद्याप उपलब्ध नसून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना इतरत्र हलवावे लागत आहे.या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले, एएसव्ही लसीचा तुटवडा राज्यभरात जाणवत असून ही लस उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. बिराजदार म्हणाले. तसेच मोबाईल व्हॅन रुग्णवाहिकेसाठी वैद्यकीय संचालनालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही डॉ. बिराजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मोबाईल व्हॅन रुग्णवाहिका संर्पदंश झालेले रुग्ण इतरत्र हलवण्यासाठी अंबाजोगाई शहरात खासगीत अथवा स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातसुद्धा मोबाईल व्हॅन रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड तर होतच आहे. या अडचणीमुळे रुग्णांना प्राणासही मुकावे लागत आहे. या संदर्भात ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी अविनाश तळणीकर, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर कोपले, अनिल बायस, मोहन कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी यांनी केली आहे.