शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी १६ ट्रॅव्हल्स जप्त

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

लातूर : वाहनांची कंपनीने दिलेल्या आकारापेक्षा अधिक लांबी वाढविणे तसेच आपत्कालीन खिडकी व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात

लातूर : वाहनांची कंपनीने दिलेल्या आकारापेक्षा अधिक लांबी वाढविणे तसेच आपत्कालीन खिडकी व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार लातूरच्या पथकाने ११ व उस्मानाबादच्या पथकाने ५ खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या १६ ट्रॅव्हल्स लातूरच्या एस.टी. डेपोत लावण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांविरुद्ध राज्यभर कारवाई मोहीम सुरू आहे. त्यानुसार लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागानेही पथकांची स्थापना करून ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत लातूरच्या पथकाने ११ खाजगी ट्रॅव्हल्स जप्त केल्या आहेत. तर उस्मानाबादच्या पथकाने ५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून जप्त करण्यात आलेली सर्व वाहने लातूर येथील एस.टी. डेपोच्या प्रांगणात लावण्यात आली आहेत. या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. शिवाय, वाहनांची लांबी वाढविणाऱ्या वाहनांची मात्र नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया होईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गिते यांनी दिली. लातुरात गेल्या तीन दिवसांपासून खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी जोरात सुरू आहे. इन्शुरन्स, टॅक्स, वाहन परवाना याबरोबरच वाहनांच्या लांबीत वाढ, आपत्कालीन खिडकी या बाबींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यात दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स आरटीओच्या पथकाकडून जप्त करण्यात येत आहेत. सध्या १६ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. दिवाळी संपताच या मोहिमेला गती आली आहे. (प्रतिनिधी)आसन क्षमतेसह ट्रॅव्हल्सच्या आकारासंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत लातूर कार्यालयाने केलेल्या कारवाईत ११ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तर उस्मानाबाद कार्यालयाने केलेल्या कारवाईत ५ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. अशा एकूण १६ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही पथकांनी जप्त केलेल्या ट्रॅव्हल्सची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. तूर्तास या ट्रॅव्हल्स लातूर एस.टी. डेपोच्या प्रांगणात लावण्यात आल्या आहेत.