शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वाळू पट्टयांना परवानगी

By admin | Updated: May 30, 2014 00:28 IST

बिलोली : चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मांजरा शेजारी असलेल्या खाजगी वाळू पट्टयातील वाळू उपशाकरिता अखेर परवानगी देण्यात आली आहे़

 बिलोली : चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मांजरा शेजारी असलेल्या खाजगी वाळू पट्टयातील वाळू उपशाकरिता अखेर परवानगी देण्यात आली आहे़ दरम्यान, आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येत असल्याने वाळू उपसा सुरू झाला आहे़ इकडे २२ कोटी दंड आकारलेल्या सगरोळी व येसगी या शासकीय वाळू घाटावरील वाळू उपशाला अद्याप मंजुरी देण्यात आली नाही़ दरम्यान, वाळूची मागणी वाढल्याने रात्रीच्या वेळी चोरटी वाहतूक बिनधास्त होत आहे़ बॅक वॉटरच्या माध्यमातून नदीशेजारी शेतामध्ये जमा होणार्‍या वाळूसाठी परवानगी दिली जाते़ महसूल गौण खनिज व पर्यावरण विभागाच्या अहवालानुसार सर्व्हेक्षण करून साठा निश्चित केला जातो़ शासनाच्या दरपत्रकानुसार रॉयल्टी आकारल्यानंतर वाळू उपसा केला जातो़ बिलोलीसह देगलूर तालुक्यात मागच्या सहा-सात वर्षापासून अशी परवानगी दिली जात आहे़ पण या ना त्या कारणामुळे गतवर्षी परवानगी देण्यास उशीर झाला, त्यामुळे वाळू उपसाच झाला नाही़ परिणामी विना-परवाना मोठ्या प्रमाणात वाळू लंपास झाली़ वाळूच्या प्रचंड मागणीमुळे वाळू तस्करांची टोळी तयार झाली़ लगतच्या तेलंगणात चोरटी वाळू लंपास करण्यासाठी चोरट्या मार्गाचा अवलंब झाला़ आता पावसाळा तोंडावर असताना परवानगी सुरू झाली आहे़ गंजगाव, बोळेगाव, येसगी अशा तीन खाजगी पट्टाधारकांना वाळू काढण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे़ ठराविक रक्कम भरल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना वाळू काढण्याची मूभा देण्यात येते़ (वार्ताहर) तालुक्यातून ३२ प्रस्ताव दाखल यावर्षी गंजगाव, कार्ला, येसगी, सगरोळी, बोळेगाव येथून ३२ प्रस्ताव आले़ पण यावर्षी देखील लहान-सहान कारणे लावून परवानगी लांबवण्यात आली़ अश धोरणामुळे महसूलचा फटका बसला व दुसरीकडे चोरीचा प्रकार वाढला़