शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाचे भाव गडगडले

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला डाळिंब विक्री सुरु केली आहे. जालना जिल्ह्यात गत काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंब, मोसंबी, चिकू तसेच फुल शेती सारख्या नगदी पिकांना प्राधान्य देत आहेत. या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नतीही साधत आहे. मात्र अस्मानी अथवा सुलतानी कारभारामुळे हे शेती धोक्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाळिंब उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलो भावाने डाळिंब विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत. एकूणच डाळिंब शेती चांगलीच अडचणीत आली आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ हजार हेक्टरवर डाळिंब शेती केली जाते. उत्पादनही चांगले निघते. कृषी विभागाकडून डाळिंब शेतीला प्रोत्साहन तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील प्रगतशील शेतकरी सरपंच पंडितराव धांडगे म्हणाले, जिल्ह्यात डाळिंबाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भाव अत्यल्प मिळत आहे. गत काही वर्षातील डाळिंब हे मोठे नुकसान आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.अंबड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी माजी सभापती सतीश होंडे म्हणाले, की शासनाने निर्यातबंदी केल्याने डाळिंबाचे भाव कमालीचे गडगडले आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर बसून आपला माल विक्री करावा लागत आहे. भाव कमी झाल्यामुळे केलेला खर्चही भरुन निघालेला नाही.जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे अचानक आवक वाढल्याने भाव वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे बहराचे नुकसान झाले होते. नवा व जुना बहार एकदाच आल्याने उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. निर्यात बंदीचा फारसा फरक पडलेला नाही. ८० टक्के डाळिंब स्थानिक पातळीवरच विक्री होते.जालना जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर डाळिंब उत्पादक विक्रीसाठी बसलेले दिसतात. काही शेतकरी तर डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत.