शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या कामाची तयारी

By admin | Updated: May 30, 2014 01:00 IST

औरंगाबाद : राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जालना रोडवरील मोंढानाका चौकात उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास गती येत आहे.

औरंगाबाद : राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जालना रोडवरील मोंढानाका चौकात उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास गती येत आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाच्या पायाभरणीचे काम सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. महामंडळाच्या वतीने मोंढानाका, सिडको बसस्थानक चौकात उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रारंभी खडक तपासणीचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना मोंढानाका चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या मार्गावर दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्त्यांचे कामही करण्यात आले. सिडको चौकातही उड्डाणपूल उभारण्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मोंढानाका येथे गुरुवारी उड्डाणपुलाच्या पायाभरणीचे काम सुरू करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स उभारण्यात आले. या दोन्ही चौकांत उड्डाणपूल उभारणीचे काम करताना पथदिव्यांचे खांब, भूमिगत जलवाहिन्या हटविणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे या मुद्यावर सध्या एमएसआरडीसी प्रशासन महापालिका, जीटीएल व अन्य संबंधित विभागांमध्ये चर्चा सुरू आहे. विजेचे खांब हटविताना अडचणी येणार नाहीत. मात्र, उड्डाणपुलाच्या मार्गात कोणत्या ठिकाणी जलवाहिनी आहे, याबाबत माहिती मिळण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामादरम्यान नेमक्या कोणत्या ठिकाणी जलवाहिनी आहे, हे समोर येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. लवकरच काम सुरू मोंढानाका येथील उड्डाणपुलाच्या पायाभरणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकार्‍यांनी दिली. हे आहेत कंत्राटदार मोंढानाका येथील उड्डाणपूल उभारणीचे कंत्राट मनोजा स्थापत्य, तर सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपूल उभारणीचे कंत्राट जे.एम.सी. प्रोजेक्टस् (इं) लि. यांना मिळाले आहे.