शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत राकाँचे रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी वसमत रस्त्यावर दुपारी १२ च्या सुमारास एक तास रास्ता रोको आंदोलन केले़

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी वसमत रस्त्यावर दुपारी १२ च्या सुमारास एक तास रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनामुळे वाहतूक जाम झाली होती़ महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे ईडी संचालनालयाच्या चौकशीला सहकार्य करीत असतानाही राजकीय सूडबुद्धीतून त्यांना अटक करण्यात आली़ पुरोगामी नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा सरकारचा मानस या कृतीतून सिद्ध झाल्याचा आरोप करीत परभणीमध्ये राकाँ कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार, जिल्हा परिषदेतील राकाँचे गटनेते बाळासाहेब जामकर यांच्यासह तालुकाध्यक्ष सुरेश भुमरे, नानासाहेब राऊत, चक्रधर उगले, रामेश्वर जावळे, मुंजाभाऊ गायकवाड, अ‍ॅड़ विष्णू नवले, अली खान, अनिल गोरे, गंगाधर जवंजाळ, दत्ताभाऊ काळे, शंकर भागवत, बंडू म्हेत्रे, एऩआय़ काळे व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला़