शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तरला लागली घरघर !

By admin | Updated: May 20, 2014 01:12 IST

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तीन विभागांना सध्या घरघर लागली आहे़

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तीन विभागांना सध्या घरघर लागली आहे़ भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने स्पष्ट केलेल्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकार्‍यांची धावपळ सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे़ साधारणत: ३० वर्षांपूर्वी लातुरात जिल्हा रुग्णालय होते़ रुग्णांची संख्या वाढत असल्याने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लातुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास मंजूरी देण्यात आली़ परिणामी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुपांतर झाले़ त्याचा लाभ रुग्णांना मोठ्या प्रमाणात होण्यास मदत झाली आहे़ वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचारमध्ये उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढल्याचे पाहून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह खाटांच्या संख्येतही वाढ करण्यात आली़ सध्या हे रुग्णालय ५५० खाटांचे झाले आहे़ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विभाग आहेत़ वैद्यकीयचे दर्जेदार शिक्षण मिळण्याबरोबरच प्रात्यक्षिकाचाही अनुभव विद्यार्थ्यांस मिळू लागल्याने गेल्या सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली़ त्यानुसार पदवीबरोबरच पदव्युत्तरचे शिक्षणही मिळू लागले आहे़ शिक्षण त्याचबरोबर आवश्यक असलेली यंत्रसामुग्रीची तपासणी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून केली जाते़ गेल्या वर्षी या परिषदेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागातील मेडिसीन, बालरोगतज्ज्ञ आणि अन्य एका विभागाची पाहणी करण्यात आली़ यात एका विभागास अतिदक्षतेतील खाटांची संख्या कमी असल्याचे आढळून आले़ दुसर्‍या विभागात अध्यापनासाठी असलेल्या प्रोफेसरची संख्या कमी आढळली़ तसेच आवश्यक तेवढी सुविधा उपलब्ध नाही़ साहित्य सामुग्रीही अपुरी असणे़, नियमानुसार वॉर्ड नसणे अशा विविध त्रुटी आढळून आल्या़ या त्रुटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्पष्ट करून त्या दूर कराव्यात अशा सूचनाही केल्या़ परिषदेने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन धावपळ करीत आहे़ मात्र, अद्यापही त्यांची पूर्तता झाली नसल्याचे सांगण्यात आले़ विशेष म्हणजे, राज्यातील लातूरपेक्षा मोठ्या असलेल्या शहरांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतानाही त्या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम नाही़ लातुरात हा अभ्यासक्रम असून प्रशासनाच्या नियोजनाअभावी त्यास घरघर लागली आहे़ (प्रतिनिधी) लाभ कमी होण्याची भीती... लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय पदवीधर विद्यार्थ्यांबरोबर रुग्णांनाही त्याचा लाभ मिळत होता़ तीन विभागांना घरघर लागल्याने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्याची भिती व्यक्त होत आहे़ वैद्यकीयचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांवर रुग्ण तपासणीचा मोठा भार असतो़ हे विद्यार्थी कमी झाल्यास रुग्णांची अडचण होण्याची भिती व्यक्त होत आहे़ मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने तपासणी करून पदव्युत्तरच्या काही विभागांत काही त्रुटी स्पष्ट केल्या आहेत़ त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे़ त्यामुळे कुठलेही पदव्युत्तर शिक्षण बंद होण्याची भिती नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ़ एस़ आऱ गोरे यांनी सांगितले़