शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बचतीचा बार निघाला फुसका!

By admin | Updated: June 23, 2014 00:34 IST

विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेने २००७ मध्ये नाशिक येथील वीनवॉक सिस्टम्स या संस्थेबरोबर बीओटी तत्त्वावर केलेल्या वीज बचतीच्या कराराचा बार फुसका निघाला आहे.

विकास राऊत , औरंगाबाद
महापालिकेने २००७ मध्ये नाशिक येथील वीनवॉक सिस्टम्स या संस्थेबरोबर बीओटी तत्त्वावर केलेल्या वीज बचतीच्या कराराचा बार फुसका निघाला आहे. ७ वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खराब झाल्यामुळे वीज बचत झाली नाही. उलट पालिकेला ७० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
याशिवाय वीनवॉक बसविलेल्या ‘एनर्जी सेव्हर बल्ब’चा प्रकाश ३० ऐवजी १० फूट अंतरावरच पडत असल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील काहीही दिसत नाही. ७० कोटींची रक्कम शहरातील नागरिकांच्या खिशातून गेली आहे. या पैशांतून शहरातील अनेक विकासकामे होऊ शकली असती. मात्र, पालिकेच्या बेलगाम उधळणीमुळे औरंगाबादचे रस्ते अंधारात ढकलले. शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यामुळे रोज अनेक किरकोळ अपघात होतात.
२१ रोजी झाला भयानक अपघात
काल २१ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आकाशवाणीजवळ पथदिव्यांचा प्रकाश कमी असल्यामुळे ठाणे येथील कारचालकाला दुभाजक दिसले नाही. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघाताला पथदिव्यांचा प्रकाश हेच मूळ कारण होते. दिव्यांचा प्रकाश लक्समध्ये मोजला जातो. ग्राऊंड लेव्हलपर्यंत पथदिव्यांचा प्रकाश पडत नसल्यास योग्य मीटरमध्ये लक्सचे मापन झालेले नसते.
असा होता करार
वीनवॉकने ७ वर्षे देखभाल करून जुने एचपीएसव्ही बल्ब बदलणे. ७ कोटींत ७ वर्षे काम करणे. वीज बचत करून देणे. इन्फ्र ास्ट्रक्चर निर्माण करून देणे.
पथदिव्यांचा आकडा
28 हजार खांब
40 हजार बल्ब
रस्त्यांची लांबी 1300 कि़मी.
पथदिव्यांतील अंतर 30 फूट

पथदिव्यांसाठी खर्च
वीज बिल - 80 लाख
दरमहा देखभाल, दुरुस्ती- 1 कोटी दरमहा
शहरातील पथदिवे निकृष्ट दर्जाचे
शहरात सर्व मिळून २८ हजार खांब आणि त्यावर ४० हजार दिवे (बल्ब) बसविण्यात आले आहेत. ते पथदिवे वीनवॉक या संस्थेने बसविले असून खराब झाले आहेत. त्यांचा प्रकाश व्यवस्थित पडत नाही. बल्बचे रिफ्लेक्टर खराब झाले आहेत.
२५ कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित न झाल्यामुळे वीज बचत होऊनही नुकसान झाले, असे विद्युत विभागाचे अभियंता पी.आर. बनसोडे यांनी सांगितले. सिडकोचे व सहा प्रभागांतील पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम वेगवेगळ्या संस्थांकडे आहे. वीनवॉककडे शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांचे काम होते.
नवीन संस्थेचा शोध
वीनवॉक या संस्थेबरोबर केलेला ७ वर्षांचा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे पालिका नवीन संस्थेच्या शोधात निघाली आहे. पथदिव्यांचे खांब, एलईडी बल्ब, अंडरग्राऊंड केबलिंग, स्वीच बॉक्स आदी प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी बीओटीवर करार करण्यात येणार आहे. शहरात पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. बीओटीवर काम करण्यास तयार होणारी कंपनी ते इन्फ्रास्ट्रक्चर बदलून देईल. वीज बचत करणारे बल्ब बसविल्यानंतर त्यातून होणारा फायदा कंत्राटदार कंपनीला उत्पन्न म्हणून मनपा देईल.
आता कोरियन बल्ब
मनपा कोरियन कंपनीने बनविलेले एलईडी बल्ब बसविण्याच्या तयारीत आहे. आयुक्तांचे निवासस्थान, जालना रोड, नेहरू उद्यान, सिद्धार्थ उद्यानात एलईडी बल्ब बसविले असून, त्यांच्या प्रकाशाची चाचपणी सुरू आहे. आयुक्त म्हणाले की, एलईडी बल्ब बसविण्याचा विचार सुरू आहे. दरमहा ५० टक्के वीज बचतीच्या अटीवर निविदेनंतर बीओटीवर करार केला जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, महावीर चौक ते चिकलठाणा या दोन रस्त्यांंना प्राधान्य देण्यात येईल.
असा मोजतात प्रकाश
पथदिव्यांमध्ये बसविण्यात आलेल्या बल्बचा प्रकाश लक्समीटरने मोजला जातो. तज्ज्ञांच्या मते ९ मीटर उंचीवर बल्बचा प्रकाश रस्त्यावरील दोन पथदिव्यांच्या अंतरात दुप्पट पडला पाहिजे. ४ बाय २४ फिटिंगचे बल्ब सध्या शहरातील रस्त्यांवरील पथदिव्यांत आहेत. ९ मीटर उंचीची ती फिटिंग आहे. २५० वॅटची जुनी फिटिंग होती. बल्बचा प्रकाश लक्समीटरने मोजण्याचे धाडस मनपाच्या विद्युत विभागाने आजवर केले नाही. लक्स लेव्हल व वीज बचतही कागदोपत्रीच दाखविण्यात आली.