अध्यात्मामध्येच पिढी घडविण्याची ताकद

By Admin | Updated: January 18, 2015 00:27 IST2015-01-18T00:10:31+5:302015-01-18T00:27:26+5:30

मंठा : अध्यात्मामध्ये मोठी ताकद आहे. भटकलेली समाज व्यवस्था अध्यात्मामुळेच जागेवर येऊ शकते. अनेक थोर संतांनी, विश्व बंधुत्वाची,

The power to create a generation within Spirituality | अध्यात्मामध्येच पिढी घडविण्याची ताकद

अध्यात्मामध्येच पिढी घडविण्याची ताकद


मंठा : अध्यात्मामध्ये मोठी ताकद आहे. भटकलेली समाज व्यवस्था अध्यात्मामुळेच जागेवर येऊ शकते. अनेक थोर संतांनी, विश्व बंधुत्वाची, एकात्मतेची शिकवण देऊन समाजामध्ये सुसंस्कारीत पिढी घडविण्याची ताकद अध्यात्मामध्ये असल्याचे निरूपन बालकीर्तनकार ह.भ.प.छकुलीताई चापाईतकर यांनी केले.
विवेकानंद नगरात आयोजित भागवत ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित हरीकिर्तनमध्ये चौथ्या दिवशी देह जावा अथवा राहावो, पांडूरंग गोड भावा या अभंगावर बोलतांना बालकिर्तनकार ह.भ.प. छकुलीताई चापाईतकर म्हणाल्या, माणसाचा श्वास परमेश्वराच्या हातात असून परमेश्वरावर गाढा विश्वास ठेवा. आयुष्याचे कल्याण होईल.
या कार्यक्रमास सभापती सुरेश सरोदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भारत बोराडे, समितीचे अध्यक्ष पांडूरंग खराबे, रामेश्वर नवटके, डॉ.कालीदास देशमुख, पांडूरंग पडूळ, सुदाम खरात, संजय शहाणे, भगवान खंडागळे, उध्दव निर्मळ, बाबासाहेब ताठे, प्रदीप बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, गणेश शहाणे, मधूकर लिंबोने, मनोज राठी, लक्ष्मीकांत लखोटिया, सतीष
निर्मळ, प्राचार्य भारत खंदारे, प्रा.सदाशिव कमळकर, यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांतील भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)
आयुष्यामध्ये सुख शांतीसाठी साधू संतांनी नेहमीच परमेश्वराची आराधना केली. त्याप्रमाणेच माणसाने ध्यान धारण करून नामस्मरण केल्यास जीवनात आनंद होईल. त्यासाठी सत्याची कास धरावी, असे ह.भ.प.छकुलीताई चापाईतकर म्हणाल्या. आई वडील आपले दैवत असून शहरी भागात ‘हम दो हमारे दो’ची स्थिती भयानक होत आहे. नवरा बायको, नौकरी, उद्योगाच्या नादात आई वडीलांना गावाकडे सोडत आहेत. हे चुकीचे आहे. घरामध्ये संस्कारासाठी आई वडीलांबरोबरच आजी आजोबाची आवश्यकता असल्याचे ह.भ.प.चापाईतकर यांनी सांगितले.

Web Title: The power to create a generation within Spirituality