शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टपालखाते गंगाजल विकतेय...!

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

रफीक अजीज, औरंगाबाद भाविकांची गंगाजलाबाबतची श्रद्धा व श्रावणाचा महिना लक्षात घेऊन पोस्ट खात्याने आता चक्क गंगेचे पाणी विकण्यास सुरुवात केली आहे.

रफीक अजीज, औरंगाबादभाविकांची गंगाजलाबाबतची श्रद्धा व श्रावणाचा महिना लक्षात घेऊन पोस्ट खात्याने आता चक्क गंगेचे पाणी विकण्यास सुरुवात केली आहे.शहरात जुन्या बाजारातील टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयात २०० व ५०० मि. लि. अशा दोन आकारांतील गंगालाच्या बाटल्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. ऋषिकेश व गंगोत्री येथून हे पवित्र गंगानदीचे पाणी संकलित केलेले आहे. बुधवारी सुरू झालेल्या श्रावण मासानिमित्त आता जादा प्रमाणात या बाटल्यांची संभाव्य मागणी लक्षात घेऊन औरंगाबादच्या पोस्ट कार्यालयाने नोंदविली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या युगात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी टपाल खात्याला कात टाकावी लागत आहे. अशा विविध क्लृप्त्यांद्वारे व्यवसायवाढीचे प्रयत्न पोस्ट विभाग करीत आहे. गंगाजल वितरणासाठी नवी दिल्ली येथे टपाल खात्याने एक वरिष्ठ अधिकारी नेमला असून त्याच्याकडे देशभरात गंगाजल मागणीनुसार व्यवस्थित पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरिकांनी ई-पेमेंटद्वारे आगाऊ पैसे भरून मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदविल्यास घरपोच गंगाजल पाठविले जाईल. सहायक पोस्टमास्तर एस.एम. येवतीवाड हे मागणी व विक्रीचा ताळमेळ सांभाळत आहेत. वरिष्ठ पोस्टमास्तर एस.एस. परळीकर म्हणाले की, चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिक बाटल्या यासाठी वापरल्या जात आहेत. गंगाजल गंगाकाठावरूनच नीट सीलबंद करून पाठविले जाते. इच्छुक नागरिकांनी जुना बाजार कार्यालयात आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्राने सांगितले की, जनतेचा प्रतिसाद पाहून सिडको, क्रांती चौक, छावणी, वाळूज, बजाजनगर इ. कार्यालयांमध्येही ही सेवा देण्याचा टपाल खात्याचा मानस आहे.शुद्ध व निर्भेळ गंगाजलाची २०० मि.ली. ची बाटली २५ रुपयांना (आधीची किंमत १७ रु.) तर अर्धा लिटरची बाटली ३५ रुपयांना (आधीची किंमत २२ रु.) विकली जात आहे. वाढत्या एकंदरीत खर्चामुळे किंमत वाढवावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. जूनमध्ये प्रायोागिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना यशस्वी ठरली. सध्या टपाल खाते गंगाजलाच्या काऊंटर विक्रीवर भर देत आहे.