शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस वसाहतीची दुरवस्था

By admin | Updated: August 30, 2014 00:00 IST

परभणी: येथील पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

परभणी: येथील पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. मागील काही वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी येथे निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दुरवस्थेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अनेक घरांची पडझड झाली असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या भागातील रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वसाहतीत जाणे- येणे मोठे जिकरीचे काम होते. रस्त्यांवरील गिट्टी उखडून गेली आहे. पावसाळ्यात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना या रस्त्यावरुन येणे-जाणे करणे अवघड होत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे नूतणीकरण करावे, अशी मागणीही पुढे येत आहे. निवासस्थानांच्या दुरवस्थेबरोबरच अनेक सोयी-सुविधाही उपलब्ध नाहीत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दूर अंतरावर जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी वसाहतीमध्येच शाळा सुरू करावी. रात्रं दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवासस्थानांची दुरवस्था तर झालीच आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधनही तुटपुंजे आहे. या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.पोलिस वसाहतीतील समस्या व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी पोलिस अधीक्षकांकडे ऊहापोह करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी संतोष भालेराव, शरद टाकरस आदींनी केली आहे. नांदेड, लातूर या ठिकाणी नवीन इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्याचसोबत रस्त्यांची कामे देखील झाली आहेत. परभणीतही नवीन इमारतींचे निर्माण करण्यात आले. परंतु रस्त्यांची कामे केली नाही. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)या पोलिस वसाहतीमध्ये चारशे ते पाचशे कुटुंब राहतात. तसेच पोलिस अधिकाऱ्यांची ३० ते ३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. परंतु थोडाही पाऊस आला तरी निवासस्थाने गळतात. या भागात मोठमोठ्या इमारती आहेत परंतु गार्डनची सोय नाही. रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. जागोजागी उखडलेले रस्ते, रस्त्यावर मोठमोेठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. परिणामी वाहने चालविणे अवघड झाले आहे. या भागात कचराकुंडीची व्यवस्था नाही, घंटागाडी देखील येत नाही. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष घालून ते सोडवावेत, अशी मागणी जय हो मित्रमंडळाच्या वतीने अमोल रणखांब, धनंजय रणखांब, पवन मस्के, सचिन जाधव, राहुल कातकडे, नितीन आगळे, शरद टाकरस, महेश जाधव, निखिल जाधव, पप्पू तारेख, संदीप मालसमिंदर, सय्यद मुनवर आदींनी केली आहे.