आठ जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले

By Admin | Updated: September 13, 2015 00:07 IST2015-09-12T23:43:42+5:302015-09-13T00:07:24+5:30

बीड : तालुक्यातील उमरद जहांगीेर येथील मटका अड्ड्यावर बीड ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून आठ जुगाऱ्यांना पकडले.

Police arrested eight gamblers | आठ जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले

आठ जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले


बीड : तालुक्यातील उमरद जहांगीेर येथील मटका अड्ड्यावर बीड ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून आठ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून एकुण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गणेश वैजनाथ आहेर प्रकाश अभिमान तहकीक, ब्रम्हनाथ सांगुळे, दादाराव दगडु शेळके, विजय महादेव सानप, बंडु शिवाजी तहकीक, बापु साहेबराव आहेर, उद्धव दिंगाबर गोरे (सर्व रा. उमरद जहांगीर) अशी सर्व आरोपींची नावे आहेत.
बीड ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की, उमरद जहांगीरमध्ये काहीजण गावच्या वेशीजवळ जुगार खेळला जात आहेत.
त्यानुसार ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गुलाब खान नवाज खान पठाण हे कर्मचाऱ्यांसह गावात दाखल झाले. त्यांनी आठ जणांना वेस परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडेन १९ हजार ५० रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले. या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना कैलास ठोंबरे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police arrested eight gamblers