शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांचा विकास नाही

By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST

मोहन बारहाते, मानवत शहरातील एकाही भूखंडाचा नगर पालिकेच्या कारभार्‍यांनी विकास केलेला नाही. याबाबीकडे कारभार्‍यांचे कायमस्वरुपी दुर्लक्ष राहिले आहे.

मोहन बारहाते, मानवत शहरातील एकाही भूखंडाचा नगर पालिकेच्या कारभार्‍यांनी विकास केलेला नाही. याबाबीकडे कारभार्‍यांचे कायमस्वरुपी दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही. मानवत शहराचा औरस-चौरस विस्तार झाला. या विस्तारात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या. निर्माण झालेल्या वसाहतीपैकी अनेक वसाहती नगररचना विभागाकडून मान्यता घेऊन निर्माण झाल्या. तर काही अवैधरित्या निर्माण झाल्या. अवैधरित्या निर्माण झालेल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम नगर पालिकेचे असते. ज्या वसाहतीत नियमानुसार निर्माण झालेल्या असतात. त्या वसाहतीमध्ये नगर पालिकेला विकासकामांसाठी वसाहतीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के क्षेत्रफळ उद्यानासाठी तर दहा टक्के क्षेत्रफळ अंतर्गत रस्ते व नाल्यांसाठी सोडावे लागते. या भागात नगरपालिकेने निधी टाकून वसाहतीतील उद्यानांचा विकास करण्याची गरज असते. परंतु मागील अनेक वर्षांपासून मानवत नगर पालिकेने शहरातील कोणत्याही नूतन वसाहतीतील भूखंडाचा विकास केलेला नाही. या भूखंडाच्या विकासात लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या लॉन वृक्ष लागवड आदी बाबी येतात. परंतु शहरातील अनेक नूतन वसाहतींमध्ये त्यांना निर्माण होऊन दहा-दहा वर्षे होऊनही तिथे साधे रस्ते व नाल्या नाहीत. काही भागात तर अजूनही पिण्याचे पाणी पोहचणे बाकी आहे. तेव्हा या भूखंडाचा विकास करून शहरातील वसाहतीत उद्यान करणे, त्यात खेळण्या टाकणे, वृक्ष लागवड करणे आदी कामे न.प.चे कारभारी कधी मनावर घेणार या खरा प्रश्न आहे. शहरातील लहान लहान मुलांना त्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळ हा आवश्यक असतो. खेळ म्हणजे मनोरंजन, नेतृत्व, शारीरिक विकास, आरोग्य आदींचे प्रतिक असते. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानांची गरज असते. नुसती मैदाने असून चालत नाहीत तर ती मैदाने सर्वसोयींनीयुक्त असावी लागतात. परंतु नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे आजमितीस मानवत शहरातील एकाही भूखंडाचा विकास झालेला नाही. त्यामुळे लहान मुुलांचे मातीशी असणारे नाते तुटत चालले आहे. मुलांचा शारीरिक व मानसिक विकासही व्यवस्थितपणे होत नाही. भूखंडांचा विकास ही केवळ लहान मुलांचीच गरज आहे, असे नाही तर वृद्धांनाही सदपावली करण्यासाठी भूखंडांचा विकास सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे नगर पालिकेने या बाबीकडे लक्ष घालून शहरातील विविध नूतन वसाहतींमध्ये भूखंडाचा विकास करणे गरजेचे आहे. दूरदृष्टीचा अभाव नागरिकांकडून कधीही या विकासकामाबाबत नगरसेवकांकडे आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळे जैसे थे स्थितीमध्ये मानवतमधील भूखंड दिसून येतात. नगर पालिकेवर निवडून गेल्यानंतर नगरसेवकांनी नगराच्या विकासासंबंधी विचारमंथन करून त्या दृष्टीने विकासकामे करण्याची गरज असते. परंतु निवडलेल्या नगरसेवकांकडून या कामांबाबत कधीही मौखिक चर्चा होताना दिसत नाही.