वाळूज जि.प.शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:15 IST2019-07-06T23:15:11+5:302019-07-06T23:15:19+5:30

वाळूज जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवार वृक्षदिंडी काढली होती.

Plantation in Walaj Zilla parishad School | वाळूज जि.प.शाळेत वृक्षारोपण

वाळूज जि.प.शाळेत वृक्षारोपण

वाळूज महानगर: वाळूज जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवार वृक्षदिंडी काढली होती. गावातील प्रमुख मार्गावरुन ही दिंडी काढुन शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.


गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी संपूर्ण गंगापूर तालुक्यात १ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

यांतर्गत शनिवारी वाळूज जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना हातात रोपटे व जनजागृतीपर घोषणा असलेले फलक घेऊन वृक्षदिंडी काढली. गावातील प्रमुख मार्गावरुन ही वृक्षदिंडी काढून शाळेत समारोप करण्यात आला.

कार्यक्रमात सरपंच पपीन माने, सभापती ज्योती गायकवाड, कृषी विभागाच्या कांबळे, मुख्याध्यापक भिमराव पवार, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे, चेअरमन सर्जेराव भोंड, अविनाश गायकवाड, उषा पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रामेश्वर जाधव तर आभार भिमराव पवार यांनी मानले. कार्यक्रमाला शरदचंद्र अभंग, विजय साबळे, मोहम्मद अली, नुर पठाण, बबनराव गायकवाड, उमेश गंगवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation in Walaj Zilla parishad School

टॅग्स :Walujवाळूज