शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन, सातत्यामुळे मिळाले यश

By admin | Updated: June 18, 2014 01:40 IST

शिरीष शिंदे , बीड दहावीचे वर्ष सुरु झाल्यानंतर चांगले मार्क्स घेऊन पास व्हायची ही मनोमन इच्छा होती. तशी मनाशी खुनगाठ बांधली होती.

शिरीष शिंदे , बीडदहावीचे वर्ष सुरु झाल्यानंतर चांगले मार्क्स घेऊन पास व्हायची ही मनोमन इच्छा होती. तशी मनाशी खुनगाठ बांधली होती. दहावीच्या अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन व त्यात सातत्य शेवटपर्यंत ठेवल्याने तिला ९७.२० टक्के गुण मिळाले. बीड येथील ज्योती सुग्रीव सवासे हिने आपल्या यशाचे रहस्य ‘लोकमत’शी बोलताना उलगडले. ज्योती सुरवसे हि मुळची पाटोदा तालुक्यातील रहिवासी आहे.तिचे वडील सुग्रीव निवृत्ती सवासे हे माजलगाव येथील पंचायत समिती कार्यालयात वरीष्ठ सहायक पदावर कार्यरत आहेत. दहावीच्या यशाबद्दल तिने आपला मागील एक वर्षाची आठवन सांगताना म्हणाली की, दहवीचे वर्ष असल्याने जीवनाला याच वळणावर कलाटणी मिळणार असल्याची जाण होती. त्याबद्दल आई-वडिलांसह शिक्षकांनी पुरेशी माहिती दिली. वर्ष सुरु झाल्यानंतर अभ्यासक्रमाची नियोजनबद्ध तयारी केली. दररोज सकाळी सहा वाजता उठणे, परीक्षा किंवा चाचणी परीक्षा असताना चार वाजता अभ्यास करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली होती. शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा होती. शाळा सुटल्यानंतर दोन ते सहा पर्यत शिकवणी चालायची. घरी आल्यानंतर थोडासा विश्राम घेऊन सात ते साडे आठ व नऊ ते दहा या वेळेत अभ्यास करायचे. किचकट विषयांचा अभ्यास रात्री कधीच नाही केला. मॅथ व इंग्लिशसाठी सकाळचा वेळ दिला. विषयांचे नियोजन करण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने आखणी केली होती. मराठीसाठी नियमीत वाचन केले. इंग्रजी व संस्कृत विषयाच्या व्याकरणावर भर दिला. इतिहासमधील इसवी सन व नावे लक्षात ठेवण्यावर विशेष लक्ष दिले. मॅथ विषयासाठी टेक्निकवर भर दिला. विज्ञानाचे कन्सेप्ट समजवून घेतले. दहावीचे वर्ष असल्याने क्लास सुटल्यानंतर क्लासमध्ये शिकविलेल्या धड्याचे रिव्हीजन करायचे. त्यात जे काही समजले नाही ते दुसऱ्या दिवशी सरला विचाराये त्यामुळे डोळ्याखालून वारंवार विषयाची उजळणी झाली. अभ्यासाचे नियोजन केले होते. प्रत्येक विषयाची आणखी पहिल्यापासूनच केली होती. त्यामुळे परीक्षा देताना अडचणी आल्या नाहीत. नियोजनामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात विद्यार्थ्यांनी टाळाटाळ केल्यास परिक्षेत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पहिल्यापासूनच अभ्यास करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. पुढे डॉक्टर होण्याचा संकल्प ज्योतीने व्यक्त केला.