शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खते वाटपाचे नियोजन करा

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : येत्या खरीप हंगामात बियाणे आणि खत वाटपाबाबत शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही व त्यांच्या तक्रारी येणार नाहीत

 उस्मानाबाद : येत्या खरीप हंगामात बियाणे आणि खत वाटपाबाबत शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही व त्यांच्या तक्रारी येणार नाहीत यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सोमवारी पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम-२०१४ आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, विभागीय कृषी सहसंचालक पुणे तथा पालक तांत्रिक अधिकारी, लातूर विभाग डॉ. मोते, कृषी सहसंचालक के.एन. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह नाबार्ड, अग्रणी बँक, सहकार, पणन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खत साठ्याचा आढावा घेतला. आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतमाल खरेदी, या हंगामात शेतकर्‍यांना पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देणे, रासायनिक खताचा ग्रेडनिहाय पुरवठ्याबाबतची माहिती व मागणी, कापूस व सोयाबीन बियाणे मागणी, कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याबाबतची सद्यपरिस्थिती, सुक्ष्म सिंचन योजना आदींची माहिती त्यांनी घेतली. विविध योजनेंतर्गत शेततळे कार्यक्रम घेण्यात आला. त्याची माहितीही त्यांनी संबंधितांकडून घेतली. खरीप हंगामात राष्ट्रीयकृत तसेच इतर बँकांकडून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. वीज मंडळाच्या कारभाराबाबतही पालकमंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. नारनवरे यांनीही पीककर्ज आणि वीजपुरवठा यासंदर्भात बँका तसेच वीज मंडळाच्या अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे सांगितले. ढिसाळपणा करणार्‍या यंत्रणांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खत व बियाण्यांची टंचाई नाही खरीप हंगामाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४.५९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. यावर्षी खरिपासाठी खत व बियाण्यांची टंचाई नसल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गत वर्षीप्रमाणे यंदाही बांधावर खत वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यामध्ये खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३.९० लाख हेक्टर असून, सन २०१३ -१४ मध्ये ४.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. खरीप २०१४ मध्ये ४.५९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. खरीप २०१३ मध्ये विविध पिकांचे ४९ हजार २६७ क्विटंल बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ४२ हजार ६९५,उडीद २ हजार ९२५, तूर १ हजार २०७, मका ७३५, कपूस २८२ क्विटंल बियाणेचा समावेश होता. सोयाबीन बियाणाची खरीप २०१४ मध्ये टंचाई भासण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:कडील बियाणाची उगवण शक्ती तपासून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप २०१४ मध्ये विविध पिकांसाठी ९० हजार मे.टन रासायानिक खतांची मागणी नोंदविली असून ७२ हजार ८०० मे.टन मंजूर झालेले असून १३ हजार ९९७ मे.टन रासायनिक खत उपलब्ध झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. २०१ बँक शाखेतून पीक कर्ज जिल्ह्यातील खरीप व रबी पीककर्जासाठी २०१ विविध बँक शाखेतून कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यात राष्टÑीयीकृत ५५, खाजगी ९, महाराष्टÑ ग्रामिण बँक ३५ तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १०२ शाखांचा समावेश आहे. यंदा ८०७.८० कोटी पीककर्ज वाटपाचा लक्षांक आहे. दरम्यान, २०१३ - १४ करिता पीककर्ज वाटपाचा लक्षांक ७४९.५ कोटी एवढा होता. प्रत्यक्षात ७८२.७ कोटीचे कर्ज वाटप विविध बँकेव्दारे करण्यात आले.