शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत मजुरीऐवजी गुत्तेदारी!

By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST

शिरूर अनंतपाळ : सर्वच क्षेत्रात गुत्तेदारीचा प्रभाव वाढत असतानाच शेती व्यवसायही त्यास अपवाद राहिला नाही़ शेतीतील पेरणीपासून ते खुरपणी तसेच राशीसाठीची कामे ‘गुत्तेदारी’ पद्धतीने केली जात आहेत़

शिरूर अनंतपाळ : सर्वच क्षेत्रात गुत्तेदारीचा प्रभाव वाढत असतानाच शेती व्यवसायही त्यास अपवाद राहिला नाही़ शेतीतील पेरणीपासून ते खुरपणी तसेच राशीसाठीची कामे ‘गुत्तेदारी’ पद्धतीने केली जात आहेत़ त्यामुळे गुत्तेदारांचा भाव वधारला आहे़ शेती व्यवसायात मजुरीऐवजी गुत्तेदारी सुुरू झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे़शिरूर अनंतपाळ तालुक्यात लागवडी योग्य जमीन २८ हजार ५०० हेक्टर्स आहे़ यात अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे़ त्यामुळे शेती व्यवसायात मशागतीची कामे करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे़ मजूर म्हणून काम करणारे अनेकजण सालगडी म्हणून कामे करतात़ त्यामुळे त्यांना वर्षभर एकाच मालकाच्या शेतात कामे करावे लागते़ परिणामी पेरणीपासून ते खुरपणीपर्यंतची सर्व कामे करण्यासाठी मजुरांची उणीव जाणवत आहे़ त्यामुळे मशागतीची कामे करण्यासाठी स्पर्धा सुरु होऊन मजुरीऐवजी गुत्तेदारी सुरू झाली आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात साडेपाच हजार नोंदणीकृत मजुरांची संख्या असली तरी तरूणांचा शहराकडील ओढा असल्यामुळे प्रत्यक्षात मजुरी करण्यासाठी केवळ महिलाच जास्त आहेत़ त्यामुळे हंगामी कामात जास्तीत जास्त मजुरी मिळावी, यासाठी मजुरीऐवजी गुत्तेदारी पद्धतीने काम करण्याकडे कौल वाढला असून, कालौघात मजुरीऐवजी गुत्तेदारी सुरु झाली आहे़(वार्ताहर)रोजगार दुप्पट मिळत असल्याने प्राधान्य़़़शेती व्यवसायात गुत्तेदारी पद्धतीने कामे केली तर मजुरीपेक्षा दुप्पट हजेरी मिळते़ शिवाय, संघटीतपणे कामे करताना कामाचा ताण जाणवत नाही, असे मत गुत्तेदार राधिका कांबळे, सुरेखा कांबळे यांनी व्यक्त केले़ शेती व्यवसायात गुत्तेदारी सुुरू झाल्याने अल्पभूधारक शेतकरी भरडले जात असले तरी वेळेवर कामे होण्यासाठी नुकसान सहन करावे लागते, असे धोंडिराम कारभारी, विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले़