शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्रांचा विकास कागदावरच !

By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST

उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे.

उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना किमान पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला गतवर्षी सुमारे ७ कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात अवघे २ कोटी १२ लाख रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला. उर्वरित ४ कोटी ८७ लाख रूपये अखिर्चत राहिल्याने तीर्थक्षेत्रांच्या विकासाला खिळ बसली आहे.जिल्हा परिषदेची कुठलीही बैठक वा सभा असो. त्यामध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड सदस्यांतून केली जाते. निधी मिळत नाही, म्हणून सभागृह एक करणारे हे पुढारी निधी खर्चाबाबत मात्र, फारशे गंभीर नसल्याचे दिसून येते. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीच्या माध्यमातून प्रस्तावित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तनिवास, पोचरस्ता, परिसर विकास, पाणीपुरवठा आदी सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. असे असतानाही बांधकाम विभागाला अख्ख्या वर्षात सात कोटी रूपये खर्च करता आले नाहीत. वर्षभरात केवळ २ कोटी १२ लाख ३५ हजार रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला आहे. त्यामुळे सुमारे ४ कोटी ८७ लाख रूपये अखर्चित राहिले आहेत. परिणामी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला एकप्रकारे खिळ बसल्याचेच यातून समोर आले आहे. त्यामुळे सदरील निधी अखर्चित राहण्यास जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता भाविकांतून व्यक्त होवू लागली आहे. कारण निधी मिळूनही संबंधित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अपेक्षित सुविधा निर्माण होवू शकलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)