शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पीएच.डी. पेट’ साठी विद्यापीठ यंत्रणा सज्ज

By admin | Updated: August 19, 2014 02:17 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २८ सप्टेंबर रोजी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) घेतली जाणार असून,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २८ सप्टेंबर रोजी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) घेतली जाणार असून, परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी विद्यापीठाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. असे असले तरी संशोधनासाठी शिल्लक जागांचा प्रश्न अनुत्तरित आहे. यास विद्यापीठाच्या वरिष्ठ सूत्रांनी दुजोरा दिला असून, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेली पेट परीक्षेची संपूर्ण तयारी जवळपास पूर्ण होत आली असल्याचे कळविले आहे. एकूण ५३ विषयांसाठी २८ सप्टेंबर रोजी ही परीक्षा होईल.‘पेट’साठी ९ हजार २१६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. ‘पेट’चा शंभर गुणांचा पहिला पेपर हा सर्व विद्यार्थ्यांसाठी समान राहील. दुसरा पेपर हा स्पेसिलायझेशनचा असेल. तोही शंभर गुणांचा पेपर असेल. एकूण २०० गुणांची ही परीक्षा घेतली जाणार असून, विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेच्या छपाईचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात, तर दुसरीकडे ‘पेट’ अभावी त्यांना संशोधनास मुकावे लागते.यूजीसीकडे विविध फेलोशिपचा निधी दरवर्षी विद्यार्थ्यांअभावी पडून राहतो. ‘पेट’ झालीच तर पुढे विद्यापीठातील मार्गदर्शकांकडे संशोधनासाठी जागाच शिल्लक नसतात. त्यामुळे ‘पेट’ उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांच्या प्रतीक्षेत राहावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठालाच पुढाकार घ्यावा लागेल, अशी संशोधक विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार देशभरातील सर्व विद्यापीठांना २००९ पासून ‘पेट’ अनिवार्य करण्यात आलेली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच संशोधनासाठी पात्र समजले जाते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २००९ मध्ये पहिली ‘पेट’ घेतली. त्यानंतर २०१२ साली दुसरी परीक्षा झाली. त्यानंतर आजपर्यंत ‘पेट’ला येनकेन प्रकारेण मुहूर्तच लागला नव्हता. डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी वर्षातून किमान दोन ‘पेट’ झाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली.