सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

By सुमेध उघडे | Updated: April 8, 2025 13:26 IST2025-04-08T13:23:14+5:302025-04-08T13:26:39+5:30

हायकोर्टाने याचिका स्वीकारली असून पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजो होणार असल्याची माहिती आहे.

Petition filed in Aurangabad High Court in Somnath Suryavanshi death case; Adv Prakash Ambedkar himself appears as lawyer | सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

छत्रपती संभाजीनगर: परभणी येथे न्यायालयीन कस्टडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सोमनाथ यांच्या आईने हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली असून पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजो होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सूर्यवंशी यांच्यातर्फे वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर स्वतः वकील म्हणून हायकोर्टात उभे होते.

याचिकेबाबत अॅड. आंबेडकर म्हणाले की, सध्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात मॅजेस्टिक चौकशी करावी एवढीच नियमावली आहे. पण त्यानंतर पुढील कारवाई कोणी करावी, कोणी निर्णय घेयचा, कसा निर्णय घेयचा याबाबत कायदा अपूर्ण आहे. यामुळे कोर्टाला आम्ही सांगितले की,  सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. आता पुढील कारवाईसाठी पार्लमेंट पूर्ण कायदा करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली करावी. आमचे म्हणणे कोर्टाने मान्य केले आहे. याबाबत शासनाला नोटिस देण्यात आली आहे. तसेच सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी नेमावी. पण कोर्टाच्या अधिकारात या एसआयटीने काम करावे अशी मागणी केली आहे. या याचिकेवर आता २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

राज्य सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात
याचिकेतून प्रतिवादी राज्य सरकारला केले आहे. बदलापूर प्रकरणासारखेच परभणी प्रकरणात राज्य सरकारच आरोपी आहे. त्यामुळे राज्य सरकार आरोपी असून त्यांच्याकडून याचिकाकर्त्याने आणि कोर्टाने अपेक्षा ठेवता येत नाही. याबाबत कोर्टसमोर नमूना दाखवला. यावर कोर्टाने पुढील सुनावणीत याचा विचार करू असे म्हंटल्याचे अॅड, आंबेडकर यांनी सांगितले.

अहवाल चीफ जस्टीसकडे जावा
मॅजेस्टिक यांच्या अहवालानंतर निर्णय कोणी घ्यावा याबाबत कायदा अपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीत देखील हा मुद्दा मांडण्यात आला असून पूर्ण कायदा करावा असे बोलणे झाल्याची माहितीही अॅड. आंबेडकर यांनी दिली. मॅजेस्टिक चौकशीचा अहवाल चीफ सेक्रेटरी यांना सोपविण्यात आला. याबाबत गाईड लाइन नसल्याने चूक कोणाची हे सांगता येत नाही. मात्र, हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीसकडे अहवाल जायला हवा, तेव्हा त्यावर गाईडलाइन मिळेल. ही त्रुटी आमच्या याचिकेच्या माध्यमातून दूर होईल, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. तसेच सूर्यवंशी प्रकरणात पुढच्या सुनावणीत सीआयडीला देखील आरोपीच्या पिंजरीत उभे करणार असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

Web Title: Petition filed in Aurangabad High Court in Somnath Suryavanshi death case; Adv Prakash Ambedkar himself appears as lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.