शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दैदीप्यमान यशाचा ‘पॅटर्न’ !

By admin | Updated: June 18, 2014 01:41 IST

संजय तिपाले , बीड दहावी परीक्षेत बीड जिल्ह्याने यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखली़ ९१़ ८८ इतके विक्रमी गुण घेऊन जिल्ह्याने विभागातील पहिले स्थान कायम ठेवले़

संजय तिपाले , बीडदहावी परीक्षेत बीड जिल्ह्याने यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखली़ ९१़ ८८ इतके विक्रमी गुण घेऊन जिल्ह्याने विभागातील पहिले स्थान कायम ठेवले़ शिवाय यशाचा टक्का वाढता ठेवून विद्यार्थ्यांनी बीडचा नवा ‘पॅटर्न’ निर्माण केला आहे़ उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यातील ११० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे़बारावी परीक्षेत बीड जिल्ह्याने विभागात दबदबा निर्माण केला होता़ पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही दैदीप्यमान यश संपादन केले़ जिल्ह्यातील एकूण ६०९ शाळांतील ३५ हजार ५४८ विद्यार्थी दहावी परीक्षेस बसले होते़ पैकी तब्बल ३२ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ उत्तीर्ण होण्यात मुलींची टक्केवारी ९३़६२ टक्के इतकी असून ती मुलांच्या तुलनेत चार टक्के अधिक आहे़ बीडच्या मुलींनी विभागातही वर्चस्व निर्माण करुन ‘हमी भी कुछ कम नही’ असे दाखवून दिले आहे़ यशात सातत्य हवे!एकूणच राज्याच्या निकालावर दृष्टीक्षेप टाकला तर बीडच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ मुलींनी तर कमालच केली़ यश नक्कीच प्रेरणादायी आहे़ मात्र, या यशाने कोणीही हुरळून जाण्याची गरज नाही़ यशात विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावे, अशी प्रतिक्रिया केएसके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ आबासाहेब हंगे यांनी व्यक्त केली़ विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयाला प्रवेश घ्यावेत, पालकांनीही अवास्तव अपेक्षा पाल्यांवर लादू नयेत असा सल्ला त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़गतवर्षी पेक्षा अधिक यशगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३. ६४ टक्याने दहावीच्या निकालात वाढ झाली असून यावर्षी ९१. ८८ टक्के बीड जिल्ह्याचा निकाल लागला आहे. त्यामुळे बीडने निकालाची उज्वल परंपरा राखली. असा वाढला आलेखवर्षटक्केवारी२०१०७६़२१२०११७९़८२२०१२७८़३६२०१३८८़२४२०१४९१़८८१४ हजार गुणवत्ता यादीतबीड जिल्ह्यातील ६०९ शाळांतील एकूण ३५ हजार ५४८ विद्यार्थ्यांपैकी सुमारे १४ हजार १४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ७ हजार ५६२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले़ सुमारे २ हजार ८८८ विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश आले़