शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातील रूग्णसेवा सलाईनवर

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

कङा: आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर ठिकाणचाही प्रभार दिल्याने रूग्णालयातील रूग्णसेवा सलाईनवर आली आहे.

कङा: आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर ठिकाणचाही प्रभार दिल्याने रूग्णालयातील रूग्णसेवा सलाईनवर आली आहे. गांभिर्याची बाब म्हणजे येथील रूग्णसेवा सुरळीत केली जावी यासाठी गांधीगिरी आंदोलन केले तर एकदा रूग्णालयास टाळेही ठोकले. यानंतरही येथील रूग्णसेवा सुरळीत होत नसल्याचे रूग्णांचे हाल कायमच आहेत. सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास ५० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविली जाते. तसेच या केंद्रांतर्गत सावरगाव, दौलावडगाव, दादेगाव, देऊळगाव घाट, पिंप्री घाटा येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभारही हाकला जातो. या परिसरातील सुलेमान देवळा हे महत्वाचे रूग्णालय असून येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. बापू चाबुकस्वार हे काम पाहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभारही देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक वेळ आष्टीसह इतर ठिकाणी जातो. यामुळे सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रूग्णांना योग्य सेवा मिळत नाही. येथे डॉ. कराड यांचीही वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्याकडेही धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचाही बराचसा वेळ धामणगाव येथेच जातो. याचा परिणाम सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णसेवेवर झाला आहे.येथील रूग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी छावा संघटनेने रूग्णालयातील खुर्च्यांना हार घालून गांधीगिरी केली होती. याउपरही रूग्णसेवा सुरळीत होत नसल्याने छावा संघटनेने या प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले होते. मात्र यानंतरही येथील रूग्णसेवा सुरळीत झालीच नाही. यामुळे रूग्णांचे हाल कायमच आहेत. येथील रूग्णसेवा सुरळीेत करण्याची मागणी छावाचे अशोक वाघुले, दादासाहेब जगताप आदींनी केली आहे.अनेकदा उद्भवतात साथरोेगसुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये अनेकदा साथरोगांचा उद्रेक होतो. दोन दिवसांपूर्वीच या केंद्रांतर्गत दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचे रूग्ण आढळले होते. येथे सातत्याने साथीचे आजार उद्भवत असल्याने वैद्यकीय सेवेत वाढ करण्याची मागणी होत आहे. लसीकरणावरही परिणामसुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मुले, गरोदर माता यांना लसीकरण करण्यात येते. येथील आरोग्य केंद्रातील जागा रिक्त असल्याने लसीकरणासाठी आलेल्या रूग्णांनाही तासंतास ताटकळट बसावे लागते. येथील रूग्ण सेवे संदर्भात डॉ. चाबूकस्वार म्हणाले, आपण शासनाच्या निर्देशानुसार काम करीत आहोत.रूग्णांना सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच येथील रिक्त जागे संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असून जे कर्मचारी निवासी राहत नाहीत त्यांना नोटीसा दिल्याचेही डॉ. चाबुकस्वार म्हणाले. (वार्ताहर)