निगेटिव्ह, पण कोरोनासदृश लक्षणांनी रुग्ण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:50+5:302020-12-17T04:27:50+5:30

औरंगाबाद : लक्षणे कोरोनासारखी. मात्र, कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असूनही प्रकृती गंभीर झाल्याने उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत ...

The patient was hospitalized with negative, but corona-like symptoms | निगेटिव्ह, पण कोरोनासदृश लक्षणांनी रुग्ण रुग्णालयात

निगेटिव्ह, पण कोरोनासदृश लक्षणांनी रुग्ण रुग्णालयात

औरंगाबाद : लक्षणे कोरोनासारखी. मात्र, कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असूनही प्रकृती गंभीर झाल्याने उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. कोरोना रुग्णांएवढ्याच निगेटिव्ह रुग्णांवर घाटीत उपचार सुरू आहेत.

घाटी रुग्णालयात रविवारी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असलेले तब्बल ६८ रुग्ण दाखल होते. कोरोनाच्या संशयाने घाटीत दाखल झाल्यानंतर रुग्णांची कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला जातो; परंतु अहवाल निगेटिव्ह आलेला असला तरी प्रकृती चिंताजनक असल्याची परिस्थिती घाटीत दाखल अनेक रुग्णांच्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे.

निगेटिव्ह रुग्णांनाही श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम ऑक्सिजन देण्याची वेळ ओढावत आहे. काही रुग्ण अतिगंभीर होत असल्याने त्यांनाही व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे.

७७ पॉझिटिव्ह रुग्ण

घाटीत दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी ७७ होती. एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना, निगेटिव्ह मात्र प्रकृती गंभीर रुग्णही आढळत आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी घाटीतील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

Web Title: The patient was hospitalized with negative, but corona-like symptoms