शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकरांना पर्यटनाची नेहमीच ओढ

By admin | Updated: September 28, 2014 00:13 IST

परभणी : चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्या परभणीकरांचा पर्यटनासाठी देशात व विदेशात चांगलाच ओढा असल्याचे दिसून येत आहे़

परभणी : चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्या परभणीकरांचा पर्यटनासाठी देशात व विदेशात चांगलाच ओढा असल्याचे दिसून येत आहे़ निसर्गरम्य ठिकाणी जात असतानाच धार्मिक व ऐतिहासिक स्थळी जाताना परभणीकर दिसत आहेत़ २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला़ यानिमित्त आढावा घेतला असता जिल्ह्यातील नागरिक देशात व विदेशात विविध ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आले़ पर्यटनासाठी भटकंती करणाऱ्यांचे उद्देश आणि हेतु वेगवेगळे असतात़ चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्यांना एक आवश्यक बदल, विश्रांती, निवांतपणाची आवश्यकता असते़ तर काहींना निसर्गाची ओढ असते़ काही जणांना ऐतिहासिक, धार्मिक स्थळी जाण्यास स्वारस्य असते़ कारणे वेगवेगळी असली तरी आपली नियोजित पर्यटन यात्रा सुखद, संस्मरणीय व विनासायास होण्यासाठी परभणीकर अनेकदा पैसा, वेळ, श्रम खर्ची घालतात़ यासंदर्भात माहिती देताना परभणी येथील केसरी टुर्सचे एजंट नंदू तापडिया म्हणाले की, केसरी टुर्सच्या माध्यमातून दरवर्षी परभणीतून देशभरात जवळपास ५०० नागरिक पर्यटनासाठी जातात़ तर साधारणत: २५० ते ३०० नागरिक विदेशात पर्यटनासाठी जातात़ मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने पर्यटनासाठी जाणारे नागरिक परभणीतील आहेत़ देशांतर्गत ठिकाणांमध्ये केरळ, काश्मीर या ठिकाणांना अधिक पर्यटक भेटी देतात़ तर तिरुपती व दक्षिण भारतात धार्मिक स्थळांना जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे़ गट करून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या परभणीत अधिक आहे़ खाजगी एजन्सीव्यतिरिक्त स्वत: फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे तापडिया म्हणाले़ पर्यटनासाठी जाणारे पर्यटक जवळपास सहा महिने अगोदरपासूनच बुकींग करतात़ देशात पर्यटनासाठी जाण्यासाठी कमीत कमी १८ हजार रुपये एका व्यक्तीला लागतात, असे तापडिया म्हणाले़ सेवेचा दर्जा व येण्या-जाण्याचे माध्यम यावरून खाजगी कंपन्यांकडून पर्यटनाचे पॅकेज ठरविले जाते़ पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आता या व्यवसायाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळू लागला आहे़ शिवाय रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात या व्यवसायात निर्माण झाल्या आहेत़ (प्रतिनिधी)