शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

समांतर योजना म्हणजे निव्वळ भ्रमाचा भोपळा!

By admin | Updated: August 21, 2014 00:11 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पीपीपी मॉडेलवर तयार केलेली समांतर जलवाहिनीची योजना ही भ्रमाचा भोपळा आहे. पाण्याचा बाजार मांडण्याचा संकल्प त्या योजनेतून सोडण्यात आला

औरंगाबाद : महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पीपीपी मॉडेलवर तयार केलेली समांतर जलवाहिनीची योजना ही भ्रमाचा भोपळा आहे. पाण्याचा बाजार मांडण्याचा संकल्प त्या योजनेतून सोडण्यात आला असून, सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या या योजनेच्या विरोधात औरंगाबाद सामाजिक मंच लढा देणार असल्याची भूमिका आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. जनतेवरील भुर्दंड वाचविल्याचा आव मनपा सत्ताधारी, त्यांचे नेते व प्रशासनाने आणल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पाण्याच्या बाजारीकरणाच्या विरोधात जनक्रांती होऊन आंदोलन उभारले जावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. २०११ पासून आजवर या योजनेविरोधात अनेक आंदोलने सुरू आहेत. तरीही पालिकेने कुणाला जुमानले नाही. खा.चंद्रकांत खैरे, आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्या माहितीमध्ये विसंगती आहे. शिवाय पालिकेच्या बेबसाईटवर वेगळीच माहिती देण्यात आलेली आहे. २०० कोटी रुपये वाचविण्याचा केलेला दावा हा भ्रमाचा भोपळा आहे. ३ हजार कोटी रुपयांपर्यंतची वसुली औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी २० वर्षांच्या काळात करील, असा आरोप मंचचे प्रा. विजय दिवाण यांनी केला. यावेळी सुभाष लोमटे, उद्धव भवलकर, अण्णा खंदारे, सुखदेव बन, अजमत खान यांची उपस्थिती होती. जायकवाडी धरणातील सध्या असलेला पाणीसाठा व भविष्यातील पाण्याची गरज याचा काहीही विचार ही योजना तयार करताना केलेला नाही. डीएमआयसी आल्यानंतर या धरणावर त्याचा ताण पडणार आहे. १२ टीएमसी पाणी समांतर जलवाहिनीसाठी लागेल. ते कुठून आणणार. २०० गावे आणि सिंचनाच्या प्रश्नांची उत्तरे पालिका देणार काय, योजनेच्या प्रोजेक्शनवरच शंका असल्याचे प्रा.दिवाण म्हणाले.