शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनामे

By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वार्‍यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने घरांवरील पत्रे उडाली. तर असंख्य झाडे उन्मळून पडली.

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वार्‍यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने घरांवरील पत्रे उडाली. तर असंख्य झाडे उन्मळून पडली. यामुळे जीवित हानी वगळता घरांचे मोठे नुकसान झाले. विद्युत तारा निखळल्या, खांबही पडले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात २ व ३ जून रोजी अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे अनेक शेतकर्‍यांच्या घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले. त्याचप्रमाणे झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटणे, विद्युत खांब पडणे यासारखे प्रकारही घडले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत संबंधित गावात जाऊन पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जालना तालुक्यातील मानेगाव, निपाणी पोखरी, नसडगाव, घोडेगाव, धानोरा, टाकरवन, हस्तेपिंपळगाव, मोतीगव्हाण, हिवर्डी या भागात नुकसान झाले. चार्‍याच्या थप्प्याही उडाल्या. उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा व तहसीलदार जे.डी. वळवी यांनी मंगळवारी या भागाचा दौरा करून बाधित भागांची पाहणी केली. या भागाचा पंचनामा करून अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा,आणि बदनापूर या तालुक्यांतील काही गावांमध्येही वादळी वार्‍यासह गारपीट झाली. या भागातील पंचनामेही करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)पारडगाव भागात मोठे नुकसान पारडगाव - घनसावंगी तालुक्यातील पारडगांव परिसरातील यावलपिंप्री, पांगरा, पारडगाव येथे ३ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अवकाळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. घरावरचे पत्रे उडून गेले तसेच परिसरातील १५ ते २० विद्युत खांब पडले. तारा तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नुकसान झालेल्या गावांची पाहाणी करण्यासाठी घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, सुधीर देशमुख, आर. बी. माळी आणि एम. एस. ई. बी. चे सहाय्यक अभियंता गुजरगे, रांजणीचे दुय्यम अभियंता एस. पी. पासवान यांनी गावात येवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तलाठी गैरहजर होते. ग्रामस्थांनी तहसीलदारांना गावात तलाठी येत नसल्याचे सांगितले. तेव्हा तहसीलदार यांनी सांगितले की, तलाठी पंचनामे करण्यासाठी गावात येईल. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठ्याबद्दल ग्रामस्थांनी गावात येत नसल्याबाबत तक्रार केलेली आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले, आजपर्यंत आम्ही तलाठी यांना बघितले सुध्दा नाही. गोरगरिबांच्या घरावरचे पत्र उडालेले असून काही ग्रामस्थांच्या घरावर पत्रा सुध्दा नाही, अशी ग्रामस्थाची परिस्थिती आहे.