छत्रपती संभाजीनगर : जोरदार वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी बरसलेल्या पावसाने महावितरणच्या यंत्रणेची दाणादाण उडाली. विविध ठिकाणी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडून फिडरमध्ये बिघाड झाल्याने शहर अंधारात बुडाले. काही भागांत तासाभरात वीजपुरवठा सुरळीत झाला तर काही भाग उशिरापर्यंत अंधारात होते.
पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला. पुंडलिक नगर पाण्याच्या टाकीमागे तारेवर झाड पडले. फिडर ट्रिप झाल्यानंतर हनुमान चौकात डीपीमध्ये जोरदार आवाज झाला. महापारेषणच्या हर्सूल, सातारा, चिकलठाणा १३२ केव्ही उपकेंद्रांकडून महावितरणच्या ३३ केव्ही पॉवर हाऊस, सातारा, वाल्मी, शिवाजीनगर, म्हाडा या उपकेंद्रांना येणारा वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. तसेच महावितरणचे ११ केव्ही जयभवानी नगर, राज नगर, नक्षत्रवाडी, सुधाकर नगर, गोलवाडी, रेल्वे स्टेशन रोड, राहुल नगर, एमआयटी, न्यू क्रांती नगर, रोजाबाग, कौसर पार्क, देवानगरी, चेतना नगर, चाणक्यपुरी, गजानन मंदिर, औरंगपुरा, गणेश कॉलनी, बस स्टँड, नारेगाव, पडेगाव, प्रिया कॉलनी, मोंढा, उत्तरा नगरी, आझाद चौक, जसवंतपुरा, बाफना ज्वेलर्स, देवळाई चौक, निशांत पार्क या फिडरवर बिघाड झाला. काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्या. महावितरण कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन सर्व वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला, अशी माहिती महावितरणने दिली.
अखंडित विजेचा दावा फोलसिडको एन - ४ परिसरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने ३३ केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवली. उपकेंद्रातील १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर २९ मार्च रोजी कार्यान्वित केला. यामुळे सिडको एन-४ परिसरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, असा दावा महावितरणकडून करण्यात आला. परंतु, बुधवारी रात्री पावसाला सुरुवात झाल्यानंतर एन-२, एन-३, एन-४ या भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.
Web Summary : A storm in Chhatrapati Sambhajinagar disrupted power supply, plunging the city into darkness. Fallen branches caused feeder outages, affecting several areas. Restoration efforts are underway, but some areas faced prolonged blackouts. Residents express anger over power outage claims.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में तूफान के कारण बिजली आपूर्ति बाधित, शहर अंधेरे में डूबा। गिरे हुए पेड़ों की शाखाओं से फीडर में खराबी आई, जिससे कई इलाके प्रभावित हुए। मरम्मत कार्य जारी है, लेकिन कुछ इलाकों में बिजली गुल रही। बिजली कटौती के दावों पर निवासियों ने जताया गुस्सा।