शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत रक्ताचा तुटवडा !

By admin | Updated: July 28, 2014 00:56 IST

उस्मानाबाद : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जात असले तरी मागील काही दिवसांपासून रक्तदान शिबिरे घेण्याकडे सामाजिक संस्था, विविध कार्यालये यांनी पाठ फिरविली आहे.

उस्मानाबाद : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जात असले तरी मागील काही दिवसांपासून रक्तदान शिबिरे घेण्याकडे सामाजिक संस्था, विविध कार्यालये यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळेच सध्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिदिन ५ ते ६ बॅग एवढाच रक्तसाठा उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही वेळा पेशंटला अ‍ॅडमिट करून घेऊन शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात दुर्घटना वा अपघात घडल्यास अशा जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. बहुतेक वेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते. या उद्देशानेच येथे रक्तपेढी सुरु करण्यात आली आहे. मात्र या रक्तपेढीच्या बाबतीत सध्या तरी रुग्णांना ‘असून अडचण नसून खोळंबा’ या म्हणीचाच प्रत्यय येत असल्याचे दिसून येत आहे. येथील रक्तपेढीची क्षमता एक ते दीड हजार बॅगची असली तरी सरासरी विचार केला तर प्रतिदिन ३५ ते ४० बॅग रक्त लागते. मागील पाच-सहा महिन्यापूर्वी रक्ताची फारशी चणचण भासत नव्हती. मात्र दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका रूग्णांना सोसावा लागत आहे. अपघातग्रस्तांसाठी चार-पाच बॅग रिझर्व ठेवल्या जातात, असे रूग्णालयाकडून सांगण्यात येते. दरम्यान, असे असले तरी अनेकवेळा संबंधित रूग्णाला आवश्यक ‘ग्रुप’चे रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा वेळी रूग्णांची परिस्थिती समजावून सांगून संबंधित रूग्णाला अ‍ॅडमिट करून घेऊन शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येते. रक्ताची तातडीची गरज असेल तर खाजगी पेढीतून आणावे लागते, असेही सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला पुढाकाररक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून शिबिरे घेण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयाने केले होते. त्यानुसार माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी शिबीर घेवून रक्त पुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते. त्यानुसार ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील राष्ट्रवादी भवन येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महाविद्यालयेही उदासीनयेथील रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांना पत्र देऊन व प्रत्यक्ष भेटून रक्तदान शिबिरे घेण्यासाठी विनंती केली आहे. मात्र एकही महाविद्यालयाने शिबीर घेण्यास सहमती दिली नाही, असे रक्तपेढीच्या सूत्रांनी सांगितले. शिबिरे घ्या, शिबिरे...जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या स्वाक्षरीने अनेक संस्था, महाविद्यालयांना पत्र दिली आहेत. मात्र अद्याप कोणीही शिबीर घेण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळेच रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.शासकीय कार्यालयेही मागेदोन वर्षापूर्वी उस्मानाबाद येथील पंचायत समितीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. त्यानंतर एकदाही शिबीर झाले नाही.जिल्हा परिषदेतही कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. विशेष म्हणजे रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत याबाबत चर्चाही होते. मात्र याबाबतीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अद्याप पुढाकार घेतलेला नाही.