शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन

By admin | Updated: September 11, 2014 01:10 IST

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनातर्फे येत्या रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे.

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनातर्फे येत्या रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे यादीत नाव नसलेल्यांना रविवारी घराजवळील मतदान केंद्रांवर जाऊन स्वत:चे नाव नोंदविता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक झाल्यापासून जिल्ह्यात सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली जात आहे. १ जून ते ३० जुलै या काळात व्यापक प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविली गेली. त्यानंतरही काही रविवारी मतदान केंद्रांवर नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.परिणामी लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८९ हजार मतदारांची भर पडली आहे. आता विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. तरीदेखील राहिलेल्यांना नोंदणी करता यावी यासाठी येत्या रविवारी पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वत्र मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दिवसभर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बसणार आहेत. त्यांच्याकडे नोंदणीचे अर्ज उपलब्ध असणार आहेत. हे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह तिथेच स्वीकारलेही जातील. प्रिंटर आणण्यासाठी पथक रायपूरलाजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याची खातरजमा करता येणार आहे. मतदान यंत्रावरील बटन दाबल्यानंतर लगेचच त्यातून मतदानाचा हक्कबजावल्याची प्रिंट बाहेर येईल; पण ही प्रिंट मतदाराला मिळणार नाही तर ती काही वेळ दिसून नंतर खाली ठेवलेल्या बॉक्समध्ये पडेल. त्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. आता या यंत्रांना जोडण्यासाठी रायपूर येथून प्रिंटर आणण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादचे पथक छत्तीसगड राज्यातील रायपूरला रवाना झाले आहे. तेथून १९८५ प्रिंटर आणले जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.